अणु हल्ल्यापासून बचाव करणारे बंकर विक्रीला

रशिया युक्रेन युद्धात अण्वस्त्र वापर होण्याची शक्यता वर्तवली गेल्यापासून अण्वस्त्रांपासून संरक्षण देणाऱ्या बंकर्सच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. संकटात संधी साधण्यासाठी अश्या बंकर्सच्या विक्रीने जोर पकडला आहे. या बंकर्स मध्ये आश्रय घेतला तर अण्वस्त्रांपासून कोणताही धोका नाही असे विक्रेते सांगत आहेत आणि लोक त्यावर विश्वास ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकेच्या मोटाना मध्ये असे बंकर्स विक्रीसाठी आहेत. बाहेरून अगदी साधारण दिसणारे हे बंकर्स आतून आलिशान, सर्व सुखसुविधानी परिपूर्ण आहेत. अश्या बंकर्सची किंमत १२ कोटी आहे. बंकरच्या आत उत्तम स्वयंपाकघर आणि एक खोली असून या बंकर्सना एकही खिडकी नाही. एकदा आत गेले की बाहेरच्या जगाशी काही संपर्क राहत नाही. एक हॉल चार भागात विभागाला गेला असून प्रत्येक विभागात एक किचन, एक खोली आहे.  बंकर्सचे तापमान कायम १० ते १२ डिग्री असेल अशी व्यवस्था आहे. एसी, व्हेंटीलेटर, हिटिंगची व्यवस्था आहे. शिवाय एक बेसमेंट आहे त्यात अन्नधान्य साठवणूक करता येते.

तिसरे महायुध्द कधीही सुरु होऊ शकेल या भीतीनी अनेक लोक अश्या बंकर्सची खरेदी करत असल्याचे सांगितले जात आहे.