बार्सिलोना मध्ये सुरु झाले मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०२२

जगातील सर्वात मोठा मोबाईल मेळा स्पेनच्या बार्सिलोना येथे आजपासून सुरु झाला असून ३ मार्च पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. यंदा किमान १ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची उमेद या प्रदर्शनात केली जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेळ्यात तमाम स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांची नवी नवी डिव्हायसेस सादर करत आहेत.

यावर्षी मुख्य नजर आहे काही खास कंपन्यांच्या स्मार्टफोनवर. नोकिया या मेळ्यात युबीटी- टी एक्सपी ड्युअल बँड रेडीओ लाँच करत आहे आणि अनेक स्मार्टफोन येथे सादर होणार आहेत. त्यात काही फोन खास भारतासाठी लाँच केले जात आहेत.

तैवानची लोकप्रिय कंपनी आसुस त्यांचा नवीन ‘एट झेड आणि एट झेड फ्लिप’ असे दोन फोन सादर करत आहे. हे फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहेत. पोको एम फोर प्रो स्मार्टफोन घेऊन आली आहे तर रियलमी दोन नवे स्मार्टफोन सादर करत आहे. जीटी २ व रिअलमी जीटी २ प्रो हे दोन फोन ग्लोबली लाँच केले जात आहेत. हे फोन जगात सर्वाधिक वेगाने चार्ज होणारे फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

रियलमी जीटी २ प्रो तीन फिचर्स मुळे खास आकर्षण बनला आहे. डिझाईन, कॅमेरा आणि कम्युनिकेशन संबंधी जगातील पहिले इनोव्हेशन म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. बोयोबेस्ड पॉलीमर डिझाईनचा हा जगातला पहिला फोन आहे असे म्हटले जात आहे.