पुतीन यांच्या हूबहुला लागलीय जिवाची चिंता

रशियन सेना युक्रेन मध्ये हल्ले चढवीत आहे आणि युक्रेन राष्ट्रपतींना राजधानी कीव कधीही रशियाच्या कब्जात जाईल याची चिंता वाटते आहे. दरम्यान पोलंड मधील एका व्यक्तीला निराळ्याच चिंतेने ग्रासले आहे. पोलंड मधील ५३ वर्षीय स्लाविक सोबला याचे काही फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळे कुणीही आपला जीव घेईल अशी भीती स्लाविक यांना वाटत असल्याची बातमी डेली स्टारने दिली आहे.

युद्धाला तोंड फुटल्यापासून पुतीन यांच्या विषयीच्या अनेक न ऐकलेल्या कथा जगभरातील जनता जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे. पोलंडच्या स्लाविक सोबलाची अडचण ही आहे कि तो हुबेहूब पुतीन यांच्या सारखा दिसतो. पोलंडच्या वोक्लाव येथे राहणारा स्लाविक वाहतूक व्यावसायिक आहे. त्याने अनेकदा पुतीन बनून जादा पैसे कमावले आहेत. अनेकानी त्याला पूर्वीपासूनच पुतीन यांचा हुबहू म्हणून गौरविले होते आणि स्लाविकला सुद्धा ही त्यांची खास ओळख आवडत होती. पण आता मात्र त्याची ही ओळख त्यांच्यासाठी शाप बनली आहे.

स्लाविक सांगतो तो पूर्वी कुठेही बिनधास्त जाऊ येऊ शकत होता. आता तो ज्या भागात राहतो तेथे दर १० नागरिकांमागे एक युक्रेनी नागरिक आहे. रशियाने युक्रेनवर युद्ध लाद्ल्याची किंमत स्लाविकला मोजावी लागते आहे. आता तो पूर्वी सारखा कुठेही बिनधास्त जाऊ येऊ शकत नाही कारण पुतीन शी साम्य असल्याने कुणीही आपल्या जीवे मारू शकते याची भीती त्याला वाटते आहे आणि म्हणून त्याने सुरक्षा मागितली आहे.