विवोचा एक्स नोट ७ इंची डिस्प्ले सह येणार

मुव्ही शौकीन आणि मोठ्या डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी विवो एक चांगला पर्याय घेऊन येत आहे. अनेक टिप्सटर्सनी विवो एक्स नोटची स्पेसीफिकेशन ऑनलाईन लिक केली आहेत. चीनच्या थ्री सी सर्टिफिकेट साईटवर मॉडेल नंबर व्ही २१७० ए नावाने हा फोन स्पॉट झाला आहे. हाच फोन विवो एक्स नोट नावाने लाँच केला जात असल्याचे दावा केला गेला आहे.

मार्चच्या सुरवातीलाच हा फोन सादर केला जाईल असे सांगितले जात आहे. त्याला ७ इंची सॅमसंग अमोलेड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप सह दिला जात आहे. क्वालकॉम जेन १ चीपसेट, ५ हजार एमएएचची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी दिली जाईल. हा फोन पूर्वी एनएएक्स ५ नावाने आणला जाणार होता असेही समजते.

या फोनला रिअर मध्ये ५० एमपीचा प्रायमरी तसेच ४८ एमपी, १२ एमपी व ८ एमपीचे सोनी सेन्सर, ५ एक्स झूम सह दिले जातील आणि फ्रंटला सेन्टर अलाईन पंच होल कटआउट कर्व्ह एज असेल. त्यात सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनच्या किमतीबाबत अजून माहिती दिली गेलेली नाही.