चित्रपट रसिकांना मार्च मध्ये चित्रपटांची मेजवानी

करोना संकटामुळे गेली दोन वर्षे थियेटर मध्ये सिनेमे पाहण्याची संधी हुकलेल्या चित्रपट रसिकांना मार्च २०२२ मध्ये दर आठवड्याला बड्या कलाकारांचे चित्रपट पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. बिगबी पासून प्रभास, ज्युनीअर एनटीआर, अक्षयकुमार, आलिया भट्ट, अजय देवगण अश्या एकापेक्षा एक लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट मार्च मध्ये थियेटर मध्ये प्रदर्शित होत आहेत. त्यात बायोपिक, रोमान्स, ड्रामा अश्या सर्व मनोरंजनाचा समावेश आहे.

बिगबी आणि मराठ्मोळी रिंकू राजगुरू यांच्या भूमिका असलेला झुंड ४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. हा स्पोर्ट्स संबंधित बयोपिक चित्रपट आहे. राधेशाम ११ मार्च ला प्रदर्शित होत आहे. त्यात प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असून तो रोमांटीक ड्रामा आहे. ११ मार्च रोजीच द काश्मीर फाईल्स हा मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा थ्रिलर ड्रामा आहे.

१८ मार्च रोजी अक्षयकुमारचा बहुचर्चित बच्चन पांडे येत असून हा अॅक्शन कॉमेडी ड्रामा आहे. ज्युनिअर एनटीआर , अलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या भूमिका असलेला आरआरआर २५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.