रिअलमीने भारतात ९ प्रो फाईव्ह जी स्मार्टफोन लाँच करून त्यांच्या पोर्टफ़ोलिओचा विस्तार केला असतानाचा रिअलमी ९ प्रो आणि प्रो प्लस ने १५ ते २० हजार किमतीच्या सेगमेंट मध्ये सर्वाधिक वेगाने विक्री होणारा फोन असा खिताब मिळविला आहे. रीअलमी ९ प्रोच्या पहिल्याच सेल मध्ये १०० कोटीहून जास्त रकमेचे फोन विकले गेले.२३ फेब्रुवारी रोजी हा पहिला सेल होता.
या फोनला फ्लिपकार्टवर ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. रिअलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ म्हणाले, ग्राहकांना आवडलेल्या आमच्या स्मार्टफोन सिरीज मधला हा एक फोन आहे. भारतातच नाही तर जगभरात रिअलमी ९ प्रो ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेची एक वस्तू देण्यात आम्ही यशस्वी झालो याचा हा पुरावा आहे.
रिअलमी ९ प्रो फाईव्ह जी लीडिंग लाईट शिफ्ट डिझाईन मध्ये आहे. त्याला रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला असून प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा आहे. फोन साठी ५ हजार एमएएच बॅटरी ३३ डब्ल्यू डार्ट चार्ज सपोर्ट आहे. दोन व्हेरीयंट मध्ये हा फोन सादर केला गेला आहे. ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि तीन कलर्स मध्ये हा फोन उपलब्ध आहे. भारतात या फोनची बेसिक प्राईज अनुक्रमे १७९९९ असून रिअलमी ९ प्रो प्लस साठी २४९९९ रुपये किंमत आहे. एचडीएफसी कार्ड, इझी ईएमआय सुविधा दिली गेली आहे. ग्राहकाला त्वरित दोन हजार रुपये डिस्काउंट दिला जात असल्याचे सुद्धा सेठ यांनी सांगितले.