हार्दिक पांड्यामुळे डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू सुपरस्टार कार्मेलो चर्चेत

जगात एका माणसासारखी हुबेहूब असणारी आणखी सात माणसे असतात असे म्हटले जाते. सेलेब्रिटी, कलाकार, क्रिकेटर्स त्यांच्याशी साम्य असणाऱ्या लोकांचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळतात. त्यात आता भारताचा स्टार क्रिकेटर आणि ऑलराउंडर, स्टाईल आयकॉन हार्दिक पांड्या याची भर पडली आहे. हार्दिकच्या स्टाईलची देश विदेशात कॉपी होते. पण विशेष म्हणजे हार्दिक मुळे डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू एनएक्सटी सुपरस्टार कार्मेलो हेज अचानक चर्चेत आला आहे.

कार्मेलोचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून कार्मेल आणि हार्दिक यांच्या मध्ये बरेच साम्य असल्याचे त्यातून स्पष्ट दिसत आहे. एका युजरने कार्मेलोचे हे फोटो शेअर करून खाली कॉमेंट मध्ये क्रिकेट मधील यशानंतर हार्दिकने एनएक्सटी डेब्यू केल्याचे लिहिले आहे. यामुळे सोशल मिडीयावर कार्मेल एकदम ट्रेंड होऊ लागला आहे. स्वतःच ट्रेंड होताना पाहून कार्मेल ने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कार्मेलने हार्दिकला टॅग केले असून त्याला धन्यवाद दिले आहेत. आपल्या ट्वीट मध्ये कार्मेल म्हणतो, हार्दिक मुळे मी भारतात ट्रेंड करत आहे. हार्दिकला खूप सारे प्रेम.’ कार्मेल डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू एनएक्सटी सुपरस्टार असून नॉर्थ अमेरिकन चँपियन आहे. हार्दिक कडून मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. हार्दिक नुकताच आयपीएल २०२२ सिझन मध्ये अहमदाबाद टीमचा कप्तान निवडला गेला आहे.