रशियाचे राष्ट्रपती पुतीन आहेत जगातील सर्वात श्रीमंत !

जगातील श्रीमंत किंवा धनकुबेरांच्या याद्या नेहमीच प्रसिद्ध होतात. त्यात बहुतेकवेळा उद्योगपती मोठ्या संखेने असतात. पण एखाद्या देशाचा राष्ट्रपती जगातील सर्वात श्रीमंत असू शकेल याचा कुणालाच अंदाज करता येणार नाही. राजकीय विश्लेषक बोरिस नेम्त्सोव आणि एका इंग्रजी वर्तमानपत्रात केलेल्या दाव्यानुसार जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचेच नाव घ्यावे लागेल. गेली १७ वर्षे पुतीन रशियात सत्तेवर आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाई मुळे पुतीन तसेही चर्चेत आले आहेत त्याचवेळी त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती उघड झाली आहे.

अर्थात यापूर्वीही अनेकदा पुतीन यांचे गुप्त महाल, हवेल्या चर्चेत आल्या आहेत. पण बोरिस यांच्या दाव्यानुसार पुतीन यांच्याकडे ९६४१ अब्जांचे सोने भांडार आहे. अनेक लग्झरी कार्स, विमाने, यॉट आहेत. मास्को आणि पिटस्बर्ग परिसरात सोन्याचे मोठे साठे आहेतच. पुतीन यांनी त्यांच्या मालकीचे सोने गुप्त जागी लपविले असल्याचा दावा केला जातो. पुतीन यांच्या मालकीची अनेक घरे, हवेल्या आणि एक प्रचंड महागडा गुप्त महाल आहे. पुतीन यांना वर्षाला १ लाख पौंड पगार म्हणून मिळतात. मात्र त्यांच्या या ज्ञात कमाईपेक्षा त्यांची प्रत्यक्ष संपत्ती हजारो पटीने अधिक आहे.

राजकीय विश्लेषक बोरिस नेम्त्सोव्ह यांच्या म्हणण्यानुसार पुतीन यांच्या मालकीची चार अलिशान यॉट आहेत तसेच त्यांच्या संग्रही ४३ विमाने, ७ हजार कार्स, १५ हेलीकॉप्टर्स आहेत. पुतीन यांच्या एका जेट मध्ये सोन्याचे स्वच्छतागृह असल्याचेही सांगितले जाते. न्यूजविकच्या रिपोर्ट नुसार पुतीन यांच्या ताफ्यात बुलेटप्रुफ लिमोसिन असून तिची किंमत १९२ दशलक्ष डॉलर्स आहे. पुतीन यांच्या कडे पाच कोटीहून अधिक किंमतीची महागडी घड्याळे आहेत.