आणखी तीन राफेल भारतात दाखल, एकूण ३५ विमाने आली

फ्रांसकडून भारत सरकार हवाई दलासाठी खरेदी करत असलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी आणखी तीन विमाने मंगळवारी भारतात दाखल झाली आहेत. झालेल्या करारानुसार ३५ विमाने आत्तापर्यंत भारतात पोहोचली आहेत आणि एक विमान काही आठवड्यात दिले जाणार आहे. २०१६ मध्ये भारत सरकारने ६० हजार कोटींचा ३६ राफेल विमानांसाठीचा करार फ्रांसच्या दुसा कंपनीबरोबर केला होता. मंगळवारी दाखल झालेल्या तीन विमानांना युएई मध्ये हवाई इंधन दिले गेले.

भारतीय वायुदालाला मिळालेल्या राफेल लढाऊ विमानांमुळे हवाई दलाची क्षमता वाढली आहे. दोन इंजिनवाली ही विमाने जमीन, समुद्री हल्ले, हवाई रक्षा, व हवाई हल्ले, टोही व परमाणु हल्ला प्रतिबंध करणे अशी अनेक कामे करू शकतात. वायुसेनेत दाखल झालेल्या या एकूण विमानांपैकी ३० विमाने थेट फ्रांस ते भारत असा पल्ला पार करून आलेली आहेत.

लढाऊ विमानांमध्ये राफेल हे सर्वात ताकदवर फायटर जेट मानले जाते. ताशी १८०० किमी पेक्षा जास्त वेगाने ते उडू शकते. पे लोड शिवाय या विमानाचे वजन १० टन आहे आणि मिसाईलसह त्याचे वजन आहे २५ टन. अनेक प्रकारची मिसाईल्स वाहून नेण्याची या जेटची क्षमता आहे. एक मिनिटात हे विमान १८ हजार फुटाची उंची गाठू शकते.