मोटोरोलाचा खास फीचर्सवाला फ्रंटीअर १९४ एमपी कॅमेऱ्यासह येणार

बाजारात रोज नवे नवे स्मार्टफोन नवीन डिझाईन, नवी फीचर्स सह दाखल होत आहेत आणि नवे ट्रेंड सेट करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोटोरोलाचा १९४ एमपी कॅमेऱ्यासह येणारा नवा स्मार्टफोन चर्चेत आला असून त्याची काही फीचर्स लिक झाली आहेत. हा फोन प्रथम २०० एमपी कॅमेरा सह आणला जाणार होता पण आता त्याचे काही एमपी कमी केले गेले आहेत. हा फोन मोटोरोला फ्रंटीअर नावाने बाजारात येईल असे समजते.

या फोन साठी बाकीच्या स्मार्टफोनच्या तुलनेत वेगळी खास फीचर्स दिली गेली आहेत. टिप्स्टर इव्हान ब्लासने लिक केलेल्या माहितीनुसार या फोनसाठी ४५०० एमएएचची बॅटरी १२५ डब्ल्यू फास्ट व ५० डब्ल्यू वायरलेस सपोर्ट सह दिली जाईल. कर्व्हड डिस्प्ले डिझाईनच्या या फोनला सेंटर अलाईन्ड पंच होल कंपाउंड फ्रंट कॅमेरा असेल आणि पॉवर बटण व व्हॉल्यूम रीडर राईड साईड ला दिले जाईल. युएसबी टाईप सी पोर्ट, स्पीकर ग्रील व सिमकार्ड ट्रे दिला जाईल.

फोन ६.६७ इंची अमोलेड कर्व्ह डिस्प्ले सह असेल आणि स्नॅपड्रॅगन जेन १ प्लस, १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, १९४ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ५० एमपीचा अल्ट्रा वाईड, १२ एमपीचा मॅक्रो सेन्सर व ६० एमपी फ्रंट कॅमेरा अशी त्यांची अन्य फीचर्स असतील. या फोनची किंमत भारतात ३५ ते ४० हजार दरम्यान असेल असेही समजते. हा फोन जुलाई मध्ये बाजारात येईल असे सांगितले जात आहे.