एलोन मस्क यांना पुन्हा प्रेमबाधा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांना पुन्हा एकदा प्रेमबाधा झाली आहे. त्यांच्या नव्या प्रेमामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळची त्यांची गर्लफ्रेंड एलोन पेक्षा २३ वर्षांनी लहान आहे असे समजते. एलोन मस्क यांचे यापूर्वी तीन विवाह झाले असून त्यांना सहा मुले आहेत.

गेले काही दिवस एलोन यांच्या नव्या प्रेमप्रकरणाबद्दल कुजबुज सुरु होती. नुकताच त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता आणि त्यात काळा लांब ट्रेनच कोट आणि डोळ्यावर गॉगल लावून स्वतःची ओळख लपवत असेलेली एक ‘मिस्ट्री वुमन’ दिसली होती. ही महिला म्हणजे ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बेसेट असल्याचे आता उघड झाले आहे.

नताशा हिचे शिक्षण सिडने येथेच झाले असून ड्रामा स्कूल मध्ये शिकण्यासाठी ती न्यूयॉर्क मध्ये आली तेव्हा १९ वर्षांची होती. ऑस्ट्रेलियन थियेटर फॉर यंग पिपल सह रोमिओ ज्युलीएट मध्ये तिने मुख्य भूमिका केली तेव्हा तर ती १४ वर्षाची होती. गेल्या दहा वर्षात फिल्म उद्योगात तिने चांगले बस्तान बसविले आहे. पूर्वी ती सिंगर म्हणून सुद्धा ओळखली जात होती आणि २०१७ मध्ये ब्रिटनी स्पीअरच्या बायोपिक मध्ये तिने ब्रिटनीची भूमिका केली आहे. आता एल्विस मध्ये तिचे पुन्हा दर्शन होणार असून एल्व्हिसच्या प्रेमिकेची भूमिका ती साकारत आहे.

एलोन मस्क यांनी कॅनडाच्या इलेक्ट्रोनिक पॉपसिंगर बेबी ग्रीम्स बरोबर तिसरा विवाह केला होता आणि तीन वर्षे ते एकत्र राहत होते.त्यांना एक मुलगा आहे. अगोदरच्या दोन लग्नातून एलोन यांना पाच मुले आहेत.