अरब शासक आणि गुप्तहेरांचा स्विस बँकेत प्रचंड पैसा

मध्यपूर्वेतील बड्या व्यक्तींनी स्विस बँकेत प्रचंड प्रमाणावर पैसे लपविले असल्याचा खुलासा एका रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. स्विस बँक आणि प्रसिद्ध वित्तीय संस्थान क्रेडीट सुइस तर्फे हा अहवाल दिला गेला आहे. यात ज्या खात्यांची महिती लिक झाली, त्यानुसार अरब देशातील अनेक आजी माजी शासक, गुप्तहेर यांच्या खात्यात अब्जावधी डॉलर्स लपविले गेले आहेत. जॉर्डनच्या गुप्तहेर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीच्या खात्यात सुद्धा करोडो डॉलर्स लपविले गेले आहेत.

अरब क्रांती दरम्यान इजिप्त मध्ये सत्तेवरून बेदखल झालेले राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या मुलांनी प्रचंड पैसा या स्विस बँकेत जमा केला आहे तर काही खाती इजिप्त, जॉर्डन व यमन येथील गुप्तहेरांची आहेत. अमेरिका सहकार्य, मानवाधिकार उल्लंघनाचे या व्यक्तींवर आरोप आहेत. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे, यांनी माहिती मदतीच्या स्वरुपात अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्स मिळविले असा आरोप होत आहे. २०१८ मध्ये या स्वरुपात २२ अब्ज डॉलर्स अब्दुल्ला यांच्या स्विस खात्यात जमा होते असेही सांगितले जात आहे. त्यांची सहा खाती स्विस बँकेत आहेत.

अल्जेरियाचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला बुतेफ्लिका यांच्या नावे स्विस बँकेत २००५ मध्ये ११ लाख डॉलर्स जमा झाले होते. गेली ५० वर्षे ओमानचे सुलतान राहिलेले काबूस बिन सैद यांची दोन खाती स्विस बँकेत आहेत. २०२० मध्ये सैद यांचे निधन झाले आहे.