२३ फेब्रुवारीला लाँच होताहेत टाटाच्या काझीरंगा एडिशन एसयूव्ही

काझीरंगा अभयारण्यातील एकशिंगी गेंड्याना सन्मान देण्यासाठी टाटा मोटर्स चार खास एसयूव्ही २३ फेब्रुवारी लाँच करणार असल्याची बातमी आली आहे. टाटा पंच, नेक्सोन, हॅरीअरच्या स्पेशल एडिशन साठी स्टँडर्ड एडिशन पेक्षा थोडी वेगळी फीचर्स दिली गेली आहेत असे समजते.

टाटा पंचसाठी कनेक्टेड कार टेक्निक, नेक्सोन आणि हॅरीअर साठी वायरलेस अॅपल कार प्ले, अँड्राईड ऑटो वायरलेस फोन चार्जर, पुढच्या सीट व्हेन्टीलेटेड, एअर प्युरीफायर व ऑटो डीमिंग आयआरव्हीएम दिले गेले आहे. चौथी काझीरंगा स्पेशल एडिशन सफारी असून त्यासाठी वेगळी फीचर्स नाहीत. गोल्ड एडिशन प्रमाणेच यात फीचर्स आहेत.

काझीरंगा मध्ये आढळणाऱ्या ग्रीन बेज रंगातील गवताप्रमाणे कार्सना रंग दिला गेला आहे. केबिन पूर्ण ब्लॅक डॅशबोर्ड आणि कॉन्ट्रास्ट बेज टच सीट्स, डोर पॅडस, पुढच्या सीटच्या हेडरेस्टवर १ सिंगी गेंड्याची आकृती आहे. हॅरीअरसाठी आणि सफारी साठी २.० लिटर डीझेल इंजिन आहे. पंच साठी १.२ लिटर पेट्रोल, नेक्सोन साठी १.२ लिटर टर्बो पेट्रोल आणि डीझेल इंजिन असे दोन पर्याय आहेत.