डूगीचे एस ९८ सिरीजचे खास स्मार्टफोन

डूगी त्यांचे आगामी एस ९८ सिरीज मधील खास फीचर्सचे स्मार्टफोन लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहेत. मिडिया टेकच्या नेक्स जी ६ एनएम चीपचा वापर करणारा हा पहिला स्मार्टफोन असेल असे समजते. खास फीचर्स घेऊन एस ९८, एस ९८ प्रो आणि एस ९८ अल्ट्रा अशी तीन मॉडेल्स कंपनी सादर करणार आहे. पैकी एस ९८ मार्च मध्ये तर बाकी दोन एप्रिल मे मध्ये लाँच होणार आहेत. एस प्रो आणि अल्ट्राचे खास फिचर म्हणजे यात दोन स्क्रीन सह नाईट व्हिजन कॅमेरा दिला जात आहे.

एस ९८ सिरीज मध्ये ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, हेलिओ जी ९६ चिपसेट असेल व मायक्रोएसडी कार्ड च्या सहाय्याने त्याची मेमरी ५१२ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. अँड्राईड १२ ओएस असून तीन वर्षे सॉफ्टवेअर सपोर्ट आणि अपडेट मिळणार आहेत. फ्रंट फेसिंग १६ एमपी सेल्फी कॅमेरा, ६४ एमपी प्रायमरी आणि २० एमपी नाईट व्हिजन कॅमेरा असून अंधारात सुद्धा क्लीअर फोटो काढता येणार आहेत.

फोनसाठी ६.३ इंची एलसीडी फुल एचडी डिस्प्ले गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन सह असून डिस्प्लेच्या मागे घड्याळाच्या आकारात दुसरा डिस्प्ले आहे. यामुळे रिअर कॅमेर्याच्या सहाय्याने सुद्धा सेल्फी घेता येणार आहेत. हा डिस्प्ले कस्टम वॉल पेपरला सपोर्ट करणार आहे. फोन साठी ६००० एएमएचची बॅटरी असेल. फोनच्या किंमतींबाबत माहिती मिळू शकलेली नाही.