‘पुष्पा, द राईज’ फिल्म ऑफ द ईअर, रणवीर बेस्ट अॅक्टर
रविवारी सायंकाळी मुंबईत पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेअर मध्ये दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा, द राईज’ चित्रपटाला फिल्म ऑफ द ईअर अवार्ड मिळाले तर भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ड कप वर आधरित ’८३’ चित्रपटातील भुमिकेबद्दल रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ‘मिमी’चित्रपटातील भूमिकेबद्दल कृती सेनन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले.
जुन्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान दिला गेला तर सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार ‘शेरशाह’ ला दिला गेला. बेस्ट इंटरनॅशनल चित्रपटाचा पुरस्कार ‘अदर राउंड’ ला मिळाला. पीपल्स बेस्ट चॉइस पुरस्कार अभिमन्यू सामी आणि राधिका मदन यांना मिळाला. बेस्ट डेब्यूचे पारितोषिक ‘ तडप’ साठी अहान शेट्टी याला दिले गेले.
वेबसिरीज मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘ द फॅमिली मॅन २’ साठी पुरस्कार मिळाला तर रविना टंडन यांना आरण्यक या वेब सिरीज मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून कणिका कपूर तर गायक विशाल मित्रा यांची निवड झाली. अनुपमा बेस्ट टीव्ही सिरीयल निवडली गेली. क्रिटीक्स बेस्ट फिल्म अवार्ड सरदार उधमसिंग या चित्रपटाला मिळाले.