पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो ?

जगभरात प्रवास करण्यासाठी लागणारा पासपोर्ट हा केवळ 4 रंगामध्येच बनलेला असतो. हे चार रंग म्हणजे काळा, निळा, लाल आणि हिरवा हे आहेत. या रंगांव्यतरिक्त इतर कोणत्याही रंगात पासपोर्ट दिसत नाही. मात्र आश्चर्य म्हणजे असा कोणत्याही प्रकारचा नियम नाही की, पासपोर्ट हा याच रंगाचा बनवायला हवा. कोणताही देश हा त्याला हव्या असलेल्या रंगामध्ये पासपोर्ट बनवू शकतो. अनेक प्रकारचे रंग आणि त्याचे शेड्स आहेत, मग या चारच रंगांमध्ये पासपोर्ट का बनतो ? जाणून घेऊया.

या चार रंगांमधील पासपोर्ट हा इतर रंगांपेक्षा अधिक अधिकृत वाटतो. या गडद रंगांमुळे पासपोर्टवरील धुळ अथवा खराब झालेले देखील दिसत नाही. हे रंग अधिक अधिकृत व योग्य वाटतात यासाठी देशांनी या रंगाचे पासपोर्ट निवडले आहेत.

याशिवाय या रंगाची निवड करण्यामागे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ देखील आहे. उदाहरणार्थ इस्लामिक राष्ट्रांच्या पासपोर्टचा रंग हा हिरवा आहे. तर युरोपियन युनियनमधील बहुतांश राष्ट्रांच्या पासपोर्टचा रंग हा लाल आहे. भारताच्या पासपोर्टचा रंग निळा आहे.

असे असले तरी पासपोर्ट बनवताना देशांना काही नियम पाळावे लागतात. जसे की, पासपोर्ट हा योग्य गोष्टींपासून बनवायला हवा जे बेंड होऊ शकतील. याशिवाय रसायनांचा त्याच्या काहीही परिणाम होणार नाही, अत्याधिक तापमानात आणि प्रकाशात देखील पासपोर्टवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. याशिवाय इंटरनॅशनल सिव्हिल एविएशन ऑर्गिनायझेशन हे टाइपफेस, टाइप साइज आणि अक्षरे किती मोठी असावीत विषयी सुचना देत असते.

 

Leave a Comment