उत्तर प्रदेश सरकार आता संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी पुरोहित आणि कर्मकांड करणाऱ्यांना हायटेक बनवणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये त्यांचा सर्व डेटा वेबसाईटवर जमा होणार आहे. यामुळे पंडित आणि कर्मकांड करणाऱ्यांना ऑनलाईनच बुकिंग करून बोलवता येईल. संस्कृत संस्था रोजगारपरक प्रशिक्षक कार्यक्रमाचे आयोजन करणारे वाचस्पती मिश्रा यांनी सांगितले की, लवकरच सर्व जिल्ह्यांमधील ज्योतिष, पंडित, योग विद्या या सर्वांचे निशुष्लक प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी प्रशिक्षकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यांना दिवसाला 500 रूपये पगार देण्यात येईल.
आता भटजी देखील करता येणार ऑनलाईन बुक
प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ज्योतिष आणि पंडितांचा संपुर्ण डेटा वेबसाईटवर टाकला जाईल. तेथूनच त्यांची बुकिंग केली जाईल. प्रशिक्षणासाठी कोणत्याही जातीची व वयाची अट ठेवण्यात आलेली नाही.
मिश्रा यांनी सांगितले की, तिन्ही विधींमध्ये 30-30 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यांतर त्यांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात विशेषज्ञांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच उत्तर प्रदेश संस्कृत संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय संस्कृत विषयात आयएएस आणि पीसीएस परिक्षा देणाऱ्यांना देखील संस्था मोफत प्रशिक्षण देणार आहे.