या ठिकाणी अधिक वेळ घालवल्यास अधिकाऱ्यांना केले जाईल अलर्ट

अनेक लोकांना शौचालयात बसून फोनचा वापर करणे, वृत्तपत्र वाचणे, पुस्तके वाचण्याची सवय असते. त्यामुळे काही लोक शौचालयात बराच वेळ बसलेले असतात. मात्र आता चीनमधील शांघाईतील लोकांना शौचालयात देखील वेळेचे पालन करावे लागणार आहे. शांघाईमधील स्मार्ट सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना जर एखाद्या व्यक्तीने 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ घालवला तर त्वरित नगरपालिकेच्या आधिकाऱ्यांनी तुमची तपासणी करण्यासाठी सतर्क केले जाईल.

शहरामध्ये 150 स्मार्ट शौचालय बनवण्यात आली असून, प्रत्येक शौचालयात ह्युमन बॉडी सेंसर बसवण्यात आलेले आहे. हे सेंसर व्यक्ती शौचालयात आहे की नाही व त्याने कितीवेळ आत घालवला हे सांगते.

याशिवाय हे सेंसर शौचालयातील हवेची गुणवत्ता देखील तपासते व पाण्याची बचत करण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी सोडते.

हे नवीन स्मार्ट शौचालय चीनचा आर्टिफिशल इंटेलिजेंसचा दैनदिन गोष्टींमध्ये वापर करण्याचा प्रयत्न आहे. चीनच्या इतर शहरांमध्ये देखील अशीच स्मार्ट शौचालय बनवण्यासाठी काम सुरू आहे. मात्र या स्मार्ट शौचालयाच्या वेळेच्या मर्यादेमुळे काही नागरिक नाखूष आहेत.

Leave a Comment