रोज शेकडो कॅन्सर पिडितांना मोफत जेवण देते ही व्यक्ती

मुंबईच्या प्रसिध्द टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कडेला नेहमी एक व्यक्ती कॅन्सरच्या रूग्णांना आणि नातेवाईकांना मदत करताना दिसते. या व्यक्तीचे नाव हरखचंद सावला असे आहे. त्यांचे ‘जीवन ज्योती कॅन्सर रिलीफ अँन्ड केअर ट्रस्ट’ हे दररोज 700 पेक्षा अधिक लोकांना दोन्ही वेळेचे जेवण देते. मागील 27 वर्षांपासून हे काम सुरू असून, आताप्रर्यंत 10 लाख लोकांना मोफत जेवण देण्यात आलेले आहे. एक चुक सुधारण्यासाठी याची सुरूवात करण्यात आली होती.

सावला सांगतात की, आधी मी लोअर परेल मित्र मंडळाशी जोडलेला होतो आणि छोट्या-मोठ्या कामांमध्ये लोकांची मदत करायचो. एकदिवस एक मुलगी आपल्या कॅन्सर पिडीत आईला घेऊन आली आणि उपचाराची माहिती मागितली. त्यावेळी मी त्यांना घेऊन हॉटेल समोरील टाटा मेमोरियलमध्ये आलो. तेथे समजले की, उपचारासाठी खूप पैसे लागतील त्यामुळे त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र त्यानंतर मला समजले की, मी चुकीने त्यांना टाटा मेमोरियलच्या कमी खर्च येणाऱ्या विभागऐवजी प्रायव्हेट विभागामध्ये घेऊन गेलो. या चुकीमुळे त्यांचे खूप पैसे खर्च झाले. मी त्यांची माफी देखील मागितली, मात्र मुलीने आईच्या जीवापेक्षा दुसरी कोणतीच मोठी गोष्ट नसल्याचे म्हटले. तेव्हापासून सावला हे कॅन्सर पीडितांची मदत करत आहेत.

(Source)

सुरूवातीला सावला यांनी दोन-चार कॅन्सर रूग्णांना मोफत जेवण देण्यास सुरूवात केली. मात्र संसाधने कमी पडत असल्याने त्यांनी हॉटेल भाड्याने दिले व पैसे जमा करत कॅन्सर ट्रस्ट सुरू केले. गरजू लोकांसाठी मेडिसन बँक आणि कॅन्सर पिडित बाळांसाठी खेळण्यांची बँक देखील सुरू केली आहे.

मुंबईशिवाय जळगाव, कोलकाता सारख्या शहरांमध्ये ट्रस्टचे 12 सेंटर आहेत. ट्रस्टने इगतपुरी येथे 100 एकर जागा देखील खरेदी केली आहे. हे ट्रस्ट कॅन्सर रूग्णांना 24 तास दोन वेळेचे जेवण मोफत पुरवते. ट्रस्टच्या मुंबई ऑफिसमध्ये 35 कर्मचारी कामाला असून, दररोज जेवणावर 25 हजार रूपये खर्च होतात.

 

Leave a Comment