11 वी पास शेतकऱ्याने बनवले असे काही की, वर्षाला होते 2 कोटींची कमाई

शिक्षण हे गरजेचे आहेच. मात्र शिक्षणच माणसाला यशस्वी बनवू शकते, असे काही नाही. नवीन शोध घेण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी डिग्री नाही तर आत्मविश्वास आणि प्रेरणा महत्त्वाची असते. राजस्थानच्या जोधपूरमधील रामपुरा-मथानिया गावातील अरविंद सांखला हे शेतकरी आहेत. 11 वी पास अरविंद आपली शेती आधुनिक करण्यासाठी 5 मशीन तयार केल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या मशीनमुळे केवळ त्यांनाच नाही तर शेकडो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या मशीनच्या जोरावर अरविंद वर्षाला 2 कोटींची कमाई करतात.

मथानिया गावात आधी मिर्चीचे उत्पादन होत असे. मात्र मोनो क्रॉपिंगमुळे या भागात मिर्चांवर रोगराई पसरण्यास सुरूवात झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मिळून गाजराचे उत्पादन सुरू केले. शेतकऱ्यांची मेहनत कामाला आली व दर दिवशी गावातून 20 ते 25 ट्रक गाजर निर्यात होऊ लागले. मात्र गाजराची मुळे व्यवस्थित साफ नसल्याने बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत होता.

(Source)

1992 मध्ये अखेर अरविंद सांवला यांनी ही समस्या सोडवण्यासाठी यंत्र बनवण्याचा विचार केला. त्यांनी गाजरांची सफाई करण्यासाठी स्वतः मशीन तयार केली. त्यांची ही मशीन इतर शेतकऱ्यांना देखील आवडली. आतापर्यंत अरविंद यांनी शेती संबंधित पाच मशीन्स बनवल्या आहेत. या मशीन्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे.

ही मशीन 8 तासांमध्ये 8 क्विंटल गाजर साफ करते.  गाजरची सफाई करण्यासाठी दोन मशीन बनवण्यात आल्या असून, एक मशीन कोठेही नेता येते. तर एक मशीन मूवेबल नाही.

(Source)

या मशीनमुळे केवळ गाजराची मुळेच नाही तर गाजर धुऊन बाजारात नेण्यासाठी तयार असतात. अरविंद यांनी बनवलेल्या या मशीनची किंमत 40,500 आणि 63,500 रूपये आहे. खास गोष्ट म्हणजे कृषि विभाग त्यांच्या या मशीनवर 40 टक्के अनुदान देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे.

(Source)

अरविंद यांनी एक लोरिंग मशीन देखील बनवली आहे. तसेच लसूनसाठी देखील एक मशीन बनवली आहे. शेतकरी मशीनच्या मदतीने दिवसाला हजारो 100 ते 200 किलो लसून काढतात.

(Source)

पुदीनाच्या शेतीसाठी मशीन –

याचबरोबर पुदीन्याची शेती करण्यासाठी देखील एक मशीन तयार करण्यात आली आहे. ही मशीन पुदीन्याची पाने व देठ वेगळे करण्याचे काम करते. या मशीनमुळे पुदीन, मेथी, कौतंबीर यांच्या 30 किलोंची 30 पोती एक तासात तयार होतात.

(Source)

मिर्चीची सफाई करण्यासाठी एक मशीन –

अरविंद यांनी मिर्चीची सफाई करण्यासाठी देखील एक मशीन बनवली आहे. त्यांनी बनवलेली मशीन दर तासाला 250 किलो मिर्ची साफ करते.  ही मशीन मिर्चीला लागलेली धूळ आणि त्यातील दगड वेगळे करते.

 

 

Leave a Comment