मधुमेही पित्यासाठी गोड पदार्थ शोधल्यामुळे मिळाले दोन कोटींचे बक्षीस

डायबेटिक असणाऱ्या व्यक्तीला गोड पदार्थ खाण्यास मनाई असते. त्यामुळे या गोड पदार्थांवर पर्याय काय असा प्रश्न प्रत्येक डायबेटिकला पडतो. मॅक्सिको सिटीमध्ये राहमाऱ्या 18 वर्षीय जेव्हियर लारागौती देखील आपल्या डायबेटिक वडिलांसाठी गोड पदार्थांचा पर्याय शोधत होता. जेव्हियर हा केमिकल इंजिनिअरचा विद्यार्थी आहे.

गोड पदार्थांवर पर्यायांसाठी त्याने ‘जायलिटोल’पासून सुरूवात केली. हा भाज्या आणि फळांमध्ये आढळणारे गोड अल्काहोल आहे. याचा वापर च्युईंगम आणि लहान मुलांची औषध बनवण्यासाठी देखील केला जातो.  याचा वाईट परिणाम देखील होतो. मात्र याचा मनुष्याच्या आरोग्याला फायदा देखील आहे व याचा स्वाद साखरेप्रमाणे असतो.

मात्र यात सर्वाधिक अडचण म्हणजे जायलिटोल काढणे हे खूप अवघड आहे. कारण हे खूप महाग आहे.

जेव्हियरने यासाठी कणसाचे दाने काढल्यानंतर राहिलेल्या भागाचा इंधन म्हणून वापर करत जायलिटोल काढण्याचा स्वस्त मार्ग शोधला व याचे पेटंट देखील केले. जेव्हियरच्या या कामगिरीसाठी आता त्याला दोन कोटींचा पुरस्कार देखील मिळाला आहे. कारण आता स्वस्त जायलिटोल मिळाल्याने याचा वापर इतर वस्तूंमध्ये देखील होईल. पुरस्कराच्या रक्कमेचा वापर जेव्हियर जायलिटोलचे उत्पादन वाढवण्यासाठी करणार आहे.

जेव्हियर म्हणाला की, आता या प्रोजेक्टनंतर वडिल साखर असलेल्या वस्तूंपासून दूर राहू शकतील. त्यामुळे मी खूप खुष आहे. त्याचे वडिल लपून साखरेचे पदार्थ खात असे.  त्यामुळे त्यांचा ग्लोकोज लेव्हल देखील वाढत असे. त्यामुळे आता आता त्याचे वडिल जायलिटोलच्या पदार्थांचे सेवन करू शकतील.

 

Leave a Comment