हरवलेले वॉलेट परत करण्यासाठी व्यक्तीने वापरली हटके पध्दत

रस्त्यावर वॉलेट नकळत पडले तर आपल्याला ते परत मिळेल याची काही खात्री नसते. कामावरून घरी परत येत असताना लंडनमधील टीम कॅमेरॉनचे पाकिट रस्त्यावर पडले. यामध्ये त्याचे अनेक कार्ड आणि पैसे होते. मात्र एका व्यक्तीने त्याचे हे पॉकिट परत मिळवून देण्यास मदत केली. यातील खास गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने कॅमेरॉनचा शोध घेण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची मदत घेतली.

कॅमेरॉनने सांगितले की, ज्या व्यक्तीला माझे वॉलेट मिळाले त्याने चार वेळा माझ्या बँक खात्यात पैसे ट्रांसफर केले. प्रत्येक ट्रांझेक्शनबरोबर त्याने एक संदेश लिहिला. पहिल्या रेफ्रेंस कॉलममध्ये लिहिले की, हाय, आय फाउंड युअर, दुसऱ्या वेळेस लिहिले – वॉलेट इन द रोड, तिसऱ्यामध्ये फोन नंबर लिहिला व चौथ्या ट्रांझेक्शनच्या रेप्रेंसमध्ये फोन किंवा मेसेज करण्यास सांगितले.

कॅमेरॉनने या बँक ट्रांझेक्शनचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या पोस्टवर लोक वॉलेट परत करणाऱ्या त्या इमानदार व्यक्तीचे कौतूक करत आहेत. या पोस्टला दीड हजारांपेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले असून, शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत. एका युजरने वॉलेट परत करण्याच्या या कल्पनेचे कौतूक केले.

एका दुसऱ्या युजरने कॅमेरॉनला विचारले की, त्या व्यक्तीला तुमच्या बँकेची अकाउंटची माहिती कसी मिळाली ? यावर कॅमेरॉनने सांगितले की, युकेमध्ये बँकेच्या कार्डवर बँक अकाउंटची माहिती देण्यात आलेली असते.

Leave a Comment