चष्म्यापासून होईल सुटका, निरोगी डोळ्यांसाठी करा हे 4 उपाय

तुम्हाला माहितीये का, आपल्या शरीरातील सर्वात सक्रिय मांसपेशी या डोळ्यांमध्ये असतात. याचबरोबर डोळे आपल्या शरीरातील सर्वात सुंदर आणि नाजूक भाग देखील आहे. डोळे आपल्या शरीरातील महत्त्वपुर्ण भाग आहेत, असे म्हटले तरी देखील चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

जास्त वेळे मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनशी संपर्क येणे, आहारात काही गोष्टींची कमतरता असणे या सर्व गोष्टींमुळे चष्मा वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

काही लोकांना चष्मा चांगला दिसतो, म्हणून घालायला देखील आवडते. मात्र काही लोकांना चष्मा नको असतो. मात्र चष्मा लावला नाही तर काहीही स्पष्ट दिसत नाही. यासाठी काही जण कॉन्टॅक्ट लेंस वापरतात तर काहीजण सर्जरी करतात. मात्र याशिवाय देखील अनेक पर्याय आहेत, ज्याद्वारे तुम्ही डोळ्यांचा रोशनी वाढवण्यासास फायदा होतो.

(Source)

गवतात अनवाणी पायाने चाला –

डोळ्यांसाठी पाय कसे जबाबदार असतील, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र हे खरे आहे की, गवतात काही वेळ चालल्याने तुमच्या मेंदूला आराम मिळतो. जेव्हा तुम्ही दवबिंदू असणाऱ्या गवतावर चालता त्यावेळी त्याचा परिणाम बोटांवर होतो. त्याच डोळ्यांचे मुख्य रिफ्लेक्सोलॉजी दबाव बिंदू असतात, जे चांगल्या दृष्टीसाठी उत्तेजित करतात.

(Source)

डोळ्यांचा व्यायाम –

कॉम्प्युटर स्क्रीनवर जास्त वेळ काम केल्याने तुमची दिसण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डोळे दुखू लागतात व आग होते. डोळ्यांची उघडझाप करणे हा असाच एक व्यायाम आहे. त्यामुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होतो.  डोळ्यांसाठी आणखी एक व्यायाम म्हणजे डोळ्यांना चारही बाजूंना फिरवणे. 10 मिनिटे डोळे चारही बाजूंना फिरवा. त्यानंतर डोळे बंद करून दोन मिनिटे आराम करा. हा व्यायाम रोज केल्याने तुमचा चष्मा देखील सुटेल.

(Source)

पापण्यांना गरम करणे –

कॉम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीनकडे टक लावून काम केल्यामुळे डोळे कोरडे पडत असतात. अशा वेळी पापण्यांना गरम करणे, ऊब देणे महत्त्वाचे असते. आपल्या दोन्ही हातांना एकमेंकांवर घासा आणि गरम हातांना डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवा. असे 3-4 वेळा करा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

(Source)

आहार –

डोळ्यांवरील चष्मा दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहार आहे. चांगल्या दृष्टीसाठी या गोष्टींचे सेवन करा. हिरव्या पालेभाज्या, मासे-ट्यूना आणि सॅल्मन, विटामिन-सी संत्री आणि लिंबू, दूध, गाजर, पालक, पपई, द्राक्षे, ब्लूबेरीज यांचे सेवन करा. याशिवाय जास्त पाणी प्या आणि धुम्रपान करू नका.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment