चक्क सोन्यापासून बनवण्यात आले एटीएम कार्ड

एटीएम कार्डचा वापर आपण सर्वच जण करतो. एटीएममुळे जास्त रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज देखील पडत नाही व वेळेची देखील बचत होते. त्यामुळे एटीएम हे रोजच्या आयुष्यात महत्त्वाचे झाले आहे. मात्र तुम्ही कधी सोन्याचे एटीएम कार्ड बघितले आहे का नाही ना. मात्र एक एटीएम कार्ड पुर्णपणे सोन्यापासून बनवण्यात आले आहे.

(Source)

सोन्याचे एटीएम कार्ड बनवण्यासाठी 18 कॅरेट सोने वापरण्यात आले आहे. जे कोणी हे कार्ड घेईल, त्या व्यक्तीचे नाव व सही या कार्डावर असेल. याशिवाय या कार्डाचा वापर केल्यास कोणतीही ट्रांजेक्शन फी द्यावी लागणार नाही. हे जगातील पहिले एटीएम कार्ड आहे, जे सोन्यापासून बनवण्यात आले आहे.

(Source)

हे कार्ड ब्रिटिश सरकारच्या मालकीची कंपनी’ द रॉयल मिंट’ने बनवले आहे. सोन्यापासून बनवण्यात आलेल्या या कार्डची किंमत 18,750 युरो (जवळपास 14 लाख 70 हजार रूपये) आहे. हे कार्ड ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे.

(Source)

सोन्यापासून बनलेले हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणेच आहे. या कार्डाला लग्झरी पॅमेंट्स कार्डच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या कार्डाचे नाव रेरिस असे ठेवण्यात आले आहे. हे एटीएम कार्ड घेण्यासाठी एक विशेष अकाउंट असणे देखील गरजेचे आहे.

(Source)

हे एटीएम कार्ड अद्याप लाँच करण्यात आलेले नाही. हे कार्ड बनवणारी कंपनी ‘द रॉयल मिंट’चे पार्टनरशीप हेड सिमॉन ब्रॅडली यांनी सांगितले की, रॉयल मिंटचे हे पहिले सोनेरी कार्ड बनवून आम्ही खूप आनंदी आहोत.

Leave a Comment