मुलासाठी 5 कोटींची लँबोर्गिनी बनवली केवळ 14 लाखात

लँबोर्गिनी ही कार कोणाला चालवायला आवडणार नाही. आपल्या स्टाईल आणि वेगासाठी ही कार ओळखली जाते. प्रत्येक कार प्रेमीला वाटत असते की, ही कार त्याच्याकडे असावी. असेच स्वप्न एका लहान मुलाने बघितले. व्हिडीओ गेम खेळताना या मुलाने ही कार बघितली. कार आवडल्यानंतर त्याने या बद्दल आपल्या वडिलांना विचारले आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी अशीच कार तयार करून दिली.

(Source)

ही घटना अमेरिकेतील असून, स्टर्लिंग बँकस यांच्या मुलाने गेम खेळताना ही कार बघितली. त्यानंतर त्याने वडिलांनी विचारले की, आपण ही कार बनवू शकतो का ? पाच कोटी किंमत असणारी ही कार खरेदी करू शकत नाही हे स्टर्लिंग यांना माहित होते. स्टर्लिंग यांनी याबाबत विचार केला आणि आपल्या मुलासाठी ही कार बनवण्याचा निर्णय घेतला.

(Source)

स्टर्लिंग बँकस हे कोलोराडोच्या केएमलँब्समध्ये चीफ सायंटिफक ऑफिसर आहेत. त्यांनी 3डी प्रिटिंगचा वापर करत लँबोर्गिनी एवेंटाडोरची कॉपी तयार केली. त्यानंतर कारचा ढाचा तयार करण्यासाठी त्यांनी स्टीलचे चेसिस तयार केले. यामध्ये त्यांनी 300 हॉर्सपॉवरचे कॉर्वेट एलएस1 वी 8 इंजिन बसवले.

(Source)

कारची बॉडी बनवणे सर्वात अवघड काम होते. 3 डी प्रिटिंगचा वापर करून केवळ प्लास्टिकपासूनच वस्तू बनवण्यात आल्या. गर्मीमुळे प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यासाठी उपाय म्हणून स्टर्लिंग यांनी प्रत्येक पार्टवर कार्बन फायबरचा थर चढवला आणि त्याच्यावर पेंट केले. जेणेकरून कार हल्की व मजबूत बनेल.

(Source)

स्टर्लिंग यांनी कारचे डिझाईन बनवण्यासाठी क्रिएलिटी सीआर 10 105 डेस्कटॉप 3 डी प्रिंटरचा वापर केला. यासाठी त्यांचा खूप वेळ गेला. कारण 3डी प्रिंटरमध्ये एकावेळी छोट्या छोट्या तुकड्यांनाच डिझाईन केले जाते. कारच्या फ्रंट ब्रेकचा भाग बनवण्यासाठी तब्बल 52 तासांचा वेळ लागला. स्टर्लिंगने गाडीचे पार्ट्स जोडण्यासाठी युट्यूब व्हिडीओंची देखील मदत घेतली. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार केवळ प्रदर्शनासाठी नाही तर तुम्ही यात बसून प्रवास देखील करू शकता.

(Source)

स्टर्लिंग यांची ही कार तयार झाली असून, 5 कोटी रूपयांची लॅबोर्गिनी एवेंटाडोर बनवण्यासाठी त्यांना केवळ 20 हजार डॉलर (14.23 लाख रूपये) खर्च आला. स्टर्लिंग यांनी सांगितले की, ही कार विज्ञान, टेक्नोलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून ते यातून काहीतरी शिकतील.

 

Leave a Comment