बहिणीला निरोप देताना भावाला आले रडू, मागावी लागली सार्वजनिक माफी

बहिणीला लग्नानंतर निरोप देताना प्रत्येक भावाला रडायला येत असते. मात्र एखाद्या भावाचे हे रडणे दुसऱ्या व्यक्तीला आवडले नाही तर ? चेचन्या देशातील लोकांना एका भावाचे आपल्या बहिणीला लग्नानंतर निरोप देताना रडणे आवडले नाही. या गोष्टीवरून एवढा वाद झाला की, त्या मुलाला सार्वजनिक माफी मागावी लागली.

असे म्हटले जाते की, चेचन्याचे पुरूष हे जगातील सर्वात शक्तिशाली असतात. त्यामुळे पुरूषाने अशाप्रकारे रडणे आवडले नाही व त्याला माफी मागण्यासाठी दबाव आणण्यात आला. या माफीला काही जणांनी विरोध देखील केला. त्यांचे म्हणणे आहे की, बहिणीला निरोप देताना कोणालाही रडायला येऊ शकते.

इतिहासतज्ञ जेलिमखान मुसाइव म्हणाले की, चेचन्या येथील लग्नांमध्ये आपल्या भावनांचे प्रदर्शन करणे योग्य समजले जात नाही. केवळ मुलांनाच नाही तर मुलींना देखील हा नियम लागू होतो. हा व्हिडीओ धार्मिक नेते रमजान कदीरोव यांनी देखील बघितला. त्यांचे म्हणणे आहे की, मुलाने लग्नामध्ये रडून चेचन्या परंपरेचे उल्लंघन केले आहे. परंपरेनुसार, त्या मुलाने बहिणीच्या लग्नात देखील जाऊ नये. त्यामुळे त्याला शोधून माफी मागण्यास सांगण्यात आले.

या मुलाचा माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. चेचन्यामध्ये लग्नाविषयी काही नियम बनलेले आहेत. ज्यांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असते.

 

Leave a Comment