ग्रीक गणितानुसार, सुपरमॉडेल बेला हदीद जगातील सर्वात सुंदर महिला आहे. ‘गोल्डन रेशिओ ऑफ ब्यूटी फी’ स्टँडर्सनुसार, जगातील सर्वात सुंदर महिलेची निवड करण्यासाठी विक्टोरियाज सिक्रेट मॉडेलच्या स्टँडर्सच्या अगदी मिळता जुळता चेहरा निवडला जातो.
विज्ञानानुसार ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला
क्लासिक ग्रीक कॅलक्युलेशनवरून गोल्डन रेशिओ ऑफ ब्युटी फी ठरवण्यात येते. सुंदरता मापण्यासाठी ग्रीक तज्ञांनी या फॉर्म्युल्याचा वापर केला आहे.
गोल्डन रेशिओनुसार, 23 वर्षीय बेला हदीदचा चेहरा 94.35 टक्के एकदम अचूक आहे.
या यादीत बियॉन्सेने दुसरे स्थान मिळवले आहे. तिचा चेहरा 92.44 टक्के या रेशिओमध्ये परफेक्ट बसतो.
अभिनेत्री एम्बर हर्ड 91.85 टक्के रेशिओ सह तिसऱ्या स्थानावर आहे तर पॉप स्टार एरिअना 91.84 टक्के रेशिओसह चौथ्या स्थानावर आहे.
चेहऱ्याचे हे माजमाप लंडनमधील हार्ली स्ट्रीटमधील प्रसिध्द कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डे सिल्वा यांनी केले.
डॉ. ज्युलियनने सांगितले की, चेहऱ्याच्या अचुकतेबद्दल मोजमाप करण्यात आले त्यात बेला हदीदचा विजयी आहे. तिच्या चेहऱ्याच्या हनुवटीने सर्वाधिक 99.7 टक्के स्कोर केला आहे. हनुवटी 0.3 टक्क्यांनी संपुर्णपणे अचुक असल्यापासून ती दूर राहिली.