ब्रिटनच्या बार्ने रूल हा पठ्ठ्या दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी वॉकसाठी निघाला, मात्र वॉकसाठी निघालेला बार्ने रूल हा एक महिन्यापासून चालतच आहे. बार्नेने चेस्टर शहरापासून 800 किमीचा प्रवास करत फ्रांसमध्ये पोहचला आहे. बार्नेचा हा प्रवास स्पेनला जाऊन संपेल. बार्नेनुसार, दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी वॉकवर जाणे त्याला एवढे आवडले की, त्याने तेथूनच लाचण्यास सुरूवात केली. त्याने मागील महिन्यातच एडिनबर्ग युनिवर्सिटीतील शिक्षण सोडले आहे.
हँगओव्हर उतरवण्यासाठी वॉकवर निघालेल्या पठ्ठ्याने केला 800 किमी प्रवास
बार्नेने सांगितले की, मित्रांबरोबर खूप दारू पिली. मी विचार केला की, चाललो तर थोडे बरे वाटेल. दुसऱ्या दिवशी मला समजले की, मी 21 किमीचे अंतर पुर्ण केले आहे. तेव्हाच विचार केला की, आता मागे न वळता चालतच राहायचे.
बार्नेने सांगितले की, सरासरी दिवसाला 21 किमी चाललो. चेस्टरपासून रोस, ब्रिकबेक्यू आणि पार्टबेटवरून सेंट जर्मनी आणि तेथून रेने आणि नानटेजवरून आणि परत बोरडियुक्सला पोहचलो. या ट्रिपचा खर्च मी स्वतः करत असून, बिअर बारमध्ये काम करताना जमा केलेल्या पैशातून ही ट्रिप करत आहे.
बार्नेने सांगितले की, हा प्रवास खरचं मजेशीर होता. या प्रवासात फ्रेंच आणि स्पेनिश भाषा शिकलो. आता ट्रॅव्हिलिंगमध्येच मला आवड आहे. माझी ट्रिप स्पेनच्या वेलेंशिया येथे जाऊन संपेल. त्यानंतर मी पुन्हा पॅरिसला जाईल व त्यानंतर तेथे स्वतःचे अनुभव लिहिल. बार्नेने सांगितले की, एका पुस्तकाच्या माध्यमातून त्याची कथा त्याला दुसऱ्यांना सांगायची आहे.