या नदीवर बनवण्यात आला जगातील सर्वात मोठा जलसेतू

गुजरातच्या खेडा येथील मही नदीच्या नर्मदा मुख्य कॅनलवर जगातील सर्वात मोठे जलसेतू बनवण्यात आले आहे. याची लांबी 6002 मीटर आहे. जलसेतू  (एक्वाडक्ट) हे नदीच्या वरून कॅनेलमधील पाण्याचा प्रवाह वाहता राहावा यासाठी बनवण्यात येते. हा जलसेतू बनवण्यासाठी 3.87 लाख क्यूबिक मीटर कांक्रीटचा वापर करण्यात आला आहे. हे बुर्ज खलीफाला बनवण्यासाठी लागणाऱ्या काँक्रीट पेक्षाही अधिक आहे. बुर्ज खलीफा बनवण्यासाठी 250000 क्यूबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला होता.

नर्मदा मुख्य कॅनलची लांबी ही 534 किमी आहे. हे कॅनल काही ठिकाणी नदीच्या वरून तर काही ठिकाणी नदीच्या खालून जाते. या कॅनेलचा 460 किमी भाग गुजरातमध्ये तर 74 किमी भाग हा राजस्थानमध्ये आहे.

हा जलसेतू बनवण्यासाठी 9 वर्ष लागली असून, यासाठी 137 कोटी रूपये खर्च आहे. नदीपासून या जलसेतूची उंची 25 मीटर आहे. हा जलसेतू बनवण्यासाठी 23000 टन स्टीलचा उपयोग करण्यात आला आहे.

Leave a Comment