माणसाला मध शोधून देणारी चिमणी


निसर्ग आणि माणूस यांचे नाते अनोखे आहे. मोझाम्बिक मध्ये माणूस आणि एक छोटा पक्षी म्हणजे चिमणी यांचे परस्पर सहकार्य पाहायला मिळते. हनीगाईड असे नाव मिळालेल्या या चिमुकल्या चिमण्या माणसाना जंगलात लागलेली मधाची पोळी दाखवितात आणि त्याबदली त्यांचे खाद्य मिळवितात. यात दोघांचाही फायदा होतो.

सर्वप्रथम माणूस आणि हनीगाईड चिमणी मधले हे नाते १९८० मध्ये केनियातील इकोलोजिस्ट हुसैक इंसकल यांनी शोधले होते. पण असे म्हणतात की १६ व्या शतकात एका पाद्रीला हा छोटा पक्षी चर्च मधील मेणबत्ती घेऊन उडून जाताना आणि जोरात आवाज करून त्याने पाद्रीचे लक्ष वेधून घेऊन त्याला मधाचे पोळे दाखविताना आढळला होता.


या चिमण्या जंगलात मधाच्या शोधात असलेल्या लोकांना जोरजोरात ओरडून त्यांचे लक्ष वेधून घेतात आणि उडत उडत जाऊन जेथे मधाची पोळी असतील तेथपर्यंत नेतात. मग मध गोळा करणारे जाळ करून मधमाश्यांना उडवून लावतात. पोळ्यातील मध काढून घेतात आणि पोळ्यातील मेण या चिमण्यांना त्यांचा मोबदला म्हणून देतात. या चिमण्या हे मेण, पोळ्यातील अळ्या, अंडी यांचा फराळ करतात. चिमण्यांना हे खाद्य हवेच असते पण मधमाश्या चावतील याची भीती असते त्यामुळे त्या माणसाना पोळी दाखवितात आणि त्याबदल्यात स्वतःचे अन्न मिळवितात.

Leave a Comment