खिलाडी अक्षयकुमारचे असे आहे कार कलेक्शन
बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार त्यांच्या बच्चन पांडेचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून विशेष चर्चेत आला आहे. अक्षयची राहणी नेहमीच चर्चेत असते. तो पार्टीला जात नाही. दारू, सिगारेट सेवन करत नाही. सेटवर घराच्या जेवणाचा डबा खातो, रात्री लवकर झोपतो, व्यायामाचे वेळापत्रक सांभाळतो असे अनेक गुण सांगितले जातात. पण अक्षयला अलिशान कार्सचे वेड असून त्याच्या संग्रही एक सो एक अलिशान कार्स सुद्धा आहेत. या कार्सच्या किमतींची चर्चा वेळोवेळी होत असते.
अक्षयच्या संग्रही रोल्स रॉइस, बेन्टले, पोर्शे, मर्सिडीज, रेंज रोव्हर, होंडा, जीप अश्या अनेक कार्स आहेत. त्यातील सर्वात महाग रोल्स रॉईस फँटम १० कोटी रुपयांची आहे. ५४ वर्षीय अक्षयला स्पीड आणि थ्रील दोन्हीचा अनुभव देणारी पोर्शे एसयुवी पसंत असून तिची किंमत २ कोटी आहे. बेन्टले कॉंटीनेन्टल फ्लाईंग सुपरकार तीन कोटींची अतिशय लग्झरी कार असून मर्सिडीज जीएलएस वोग १ कोटी किमतीची आहे. ही सात सीटर एसयुव्ही बॉलीवूड मधील अनेक कलाकारांची आवडती कार आहे.
अक्षयकडे मर्सिडीज लग्झरी व्हॅन व्ही क्लास ही ७० लाखाची गाडी असून पूर्वी अक्षय हीच वापरत असे. आत्ता ही कार गॅरेजची शोभा वाढविते आहे.मर्सिडीज सेव्हन सीटर एसयूव्ही जीएल ३५० ही कार १ कोटींची आहे. रेंज रोव्हर वोग दीड कोटीची असून होंडा एसयूव्ही सीआरव्ही ही ३७ लाखाची आणि जीप कंपास ही ३४ लाखाची कार सुद्धा अक्षयकडे आहे.