सुंदर तरुणींचा देश युक्रेन आहे तरी कसा !

आजकाल युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याने वेढा दिल्याने युध्द कोणत्याही क्षणी सुरु होईल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे युक्रेन जगभर चर्चेत आला आहे. पूर्वी सोविएत युनियनचा एक भाग असलेला आणि १९९० मध्ये युनियन मधून स्वतंत्र झालेला युक्रेन नक्की आहे तरी कसा याची माहिती अनेकांना नाही. युक्रेन हा एक सुंदर देश आहेच पण येथील तरुणी जगातील सर्वात सुंदर तरुणी आहेत अशी त्याची प्रसिद्धी आहे.

रशिया नंतर हा दोन नंबरचा मोठा देश असून आनंदी लोकांचा देश म्हणून त्याची ओळख आहे. येथील मुख्य अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि कृषी उत्पादनात हा देश जगात तीन नंबरवर आहे. येथील सुशिक्षित समाज अत्याधुनिक पद्धतीने शेती करून प्रचंड पैसे कमावणारा आहे. युक्रेन मध्ये ३० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या देशात सैनिकी सेवा अनिवार्य आहे आणि ७,८०,००० सैनिक देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. जगातला सर्वाधिक अण्वस्त्रे बाळगणारा तीन नंबरचा देश आहे. युरोप मध्ये रशिया नंतर याच देशाचे सैन्य मोठे आहे.

युक्रेनची राजधानी कीव असून देशातील अन्य शहरे सुद्धा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत. देशाचा विकास चांगल्या गतीने होत असून येथे विमान उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जगातील सर्वात मोठे विमान येथेच बनते. या देशात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झालेली ७ ठिकाणे आहेत. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची असून सर्व छोटी शहरे, गावे रेल्वेने जोडलेली आहेत. बस, ट्राम सेवा स्वस्त आहेत. कीव शहरातील मेट्रो जमिनीखाली बांधलेली जगातील सर्वात खोलीवरची मेट्रो सेवा मानली जाते.

येथील नागरिक खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. येथील ब्रेड जगप्रसिद्ध आहेत. दर १०० मीटर वर किमान एक कॅफे येथे पाहायला मिळतात. येथे विविध भागात हवामान वेगळे आहे. काही ठिकाणी खूप बर्फ तर काही ठिकाणी मध्यम हवामान आहे. चेर्नोबिल अणुभट्टी याच देशात आहे. तेथून झालेल्या गळती मुळे फार मोठे नुकसान सोसावे लागले होते. आजही या शहरात कुणी राहत नाही. पर्यटक मोठ्या संखेने या देशाला भेट देतात.