भप्पी लाहिरींच्या सोन्याची अशी होणार व्यवस्था

बॉलीवूड मधील लोकप्रिय संगीतकार आणि गायक भप्पी लाहिरी यांच्यावर आज मुंबई विलेपार्ले येथे सकाळी अंत्यसंस्कार केले जात आहेत. आपल्या खास स्टाईल ने नेहमी चर्चेत असलेले भप्पी यांचे सोने वेड सर्वाना कोड्यात टाकत असे. पण त्यांच्यासाठी सोने हे खास आकर्षण होतेच पण ते सोने लकी मानत असत. रॉयल्टी मधून मिळणारे पैसे आणि प्रत्येक धनत्रयोदशीला ते सोने खरेदी करत असत. गतवर्षी धनत्रयोदशीला त्यांनी दागिन्याऐवजी सोन्याचा चहाचा सेट खरेदी केला होता आणि त्याचे फोटो शेअर केले होते.

भप्पी लाहिरी यांची एकूण संपत्ती २२ कोटी हून अधिक असून मुंबई मध्ये अलिशान घर आणि अनेक लग्झरी कार्स त्यांच्याकडे आहेत. त्यात बीएमडब्ल्यू, ऑडी सह पाच कार्स आणि टेस्ला एक्स कारचा समावेश आहे. भप्पी यांच्या संग्रही १ किलो पेक्षा जास्त सोने आहे. असे सांगतात कि भप्पी स्वतः सोन्याच्या दागिन्यांची विशेष काळजी घेत असत. दागिने साफसफाई साठी त्यांच्या कडे विशेष सहाय्यक होता. प्रत्येक दागिन्याची त्यांची वैयक्तिक वेगळी यादी केलेली आहे. ते सोन्याकडे दागिने म्हणून नाही तर अध्यात्मिक भावनेने पाहत असत. सोने दागिने हा त्यांचा सिंग्नेचार लुक बनला होता.

सोन्याच्या जाड जाड साखळ्या, ब्रेसलेट, अंगठ्या, चष्मा फ्रेम, काफलिंग असे अनेक दागिने त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे मुलगा बाप्पा आणि मुलगी रीमा यांनी वडिलांचा हा वारसा विरासत म्हणून संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. भप्पींच्या रोजच्या वापरातील चेन आणि अंगठ्या एका वेगळ्या बॉक्स मध्ये त्यांची आठवण म्हणून जतन केल्या जाणार आहेत असेही समजते.