ट्रिपल डेकर बसचा असा आहे इतिहास

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बस चे महत्व मोठे आहे. देश विदेशात सर्वत्र रस्त्यावरून धावणाऱ्या बसेस हे चित्र दिसतेच. काही ठिकाणी सिंगल बस तर अनेक शहरातून डबल डेकर बसेस सुद्धा आजही वापरत आहेत. पण अनेकांना माहिती नसेल कि काही काळापूर्वी आणि आजही काही मोजक्या शहरात ट्रिपल डेकर बसेस वापरात आहेत. ट्रिपल डेकर बसचा एक छोटासा इतिहासच आहे. कारण या बसेस प्रथम वापरात आल्या त्याला जवळजवळ ९६ वर्षे झाली. विशेष म्हणजे या बसेस डबल डेकर बस नंतर वापरात आल्या होत्या.

या ट्रिपल डेकर बसेस नक्कीच कुतूहलाचा विषय बनल्या होत्या मात्र व्यावहारिक कारणांनी त्या कायमस्वरूपी वापरात राहिल्या नाहीत. जगात पहिली डबल डेकर बस १९२३ साली आली आणि या बसचे डिझाईन लोकांसाठी आकर्षण बनले होते. त्यानंतर १९२६ मध्ये पहिली ट्रिपल डेकर बस चालविली गेली ती बर्लिनच्या स्टेडीयम रेल्वेस्टेशन साठी. त्यानंतर मल्टी लेवल बस आल्या. १९५४ मध्ये रूटमास्टर डबल डेकर सार्वजनिक वाहतुकीत आल्या, त्या लाल रंगाच्या होत्या आणि लंडन मध्ये प्रथम चालविल्या गेल्या. आजही या बसेस सुरु आहेत. पण ट्रिपल डेकर बसेस आता सरार्स दिसत नाहीत. मात्र काही खास जागी आजही ट्रिपल डेकर बसेस दिसतात.

न्यूझीलंडच्या इंटरसिटी कोचलाईन ट्रिपल डेकर बस २०१२ पासून सुरु आहेत. लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सुद्धा ट्रिपल डेकर बस दिसल्या. त्यानंतर काही चार डेकर बसचे फोटो व्हायरल झाले होते मात्र प्रत्यक्षात हे फोटो नकली होते असे उघड झाले. ट्रिपल डेकर बसेस बंद होण्यामागे काही कारणे होती. ट्रिपल डेकर बसची उंची वाढते आणि त्या अस्थिर बनतात. वळणावर या बसेस वळविणे अवघड असते आणि अनेकदा त्या उलटतात. रोम आणि त्रिपोली मध्ये १९३२ पर्यंत ट्रिपल डेकर बसेस होत्या आणि या बसमधून एकावेळी ८९ प्रवासी प्रवास करू शकत. मात्र या बसेसचा तिसरा डेक छोटा होता.