टाटा पंचनंतर नेक्सॉन, हॅरीअर, सफारीची काझीरंगा एडिशन , टीझर मधून दिले संकेत
यंदाच्या आयपीएल २०२२ चे अधिकृत प्रायोजक टाटा मोटर्स कडून आयपीएल मध्ये त्यांच्या लोकप्रिय पंच एसयूव्हीचे खास काझीरंगा एडिशन मॉडेल लिलावात ठेवले जाणार असल्याचे घोषित केले आहे. या खास एडिशनचे डिझाईन एक शिंगी गेंड्याप्रमाणे असून काझीरंगा अभयारण्य या गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ कंपनीने आणखी एक टीझर जारी केले असून त्यात नेक्सॉन, हॅरीअर, सफारी या लोकप्रिय कार्सचे काझीरंगा एडिशन आणले जात असल्याचे संकेत दिले गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार टाटा पंचच्या काझीरंगा एडिशन मध्ये एकच युनिट बनविले जाणार आहे. या मॉडेलच्या स्पेसिफिकेशन किंव फीचर्स मध्ये मोठे बदल नाहीत पण एक्सटीरीअर मध्ये मेटोर ब्रांझ कलर पेंट आणि काही कॉस्मेटिक बदल केले गेले आहेत. यात एक खास गेंडा बॅजसह रिअर विंडस्क्रीन व ग्लोव बॉक्सच्या आत बसविलेला दिसत आहे.
कंपनीने जारी केलेल्या नव्या टीझर मध्ये व्हिडीओत चार एसयूव्ही एका लाईनमध्ये दिसत असून त्यांच्या हेडलाईट मधून गेंड्याची एका प्रतिमा निर्माण झालेली दिसत आहे. हा टीझर सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला आहे. टीझरला सिंगल लाईन कॅप्शन दिले गेले असून त्यात ‘ untamed’ इतकेच शब्द आहेत. या खास एडिशन कार्स बाजारात कधी येणार कि त्यांचेही प्रत्येकी एकच युनिट बनविले जाणार याचा खुलासा झालेला नाही.