विराट मोहाली मध्ये खेळणार १०० वी कसोटी

बीसीसीआयने आगामी श्रीलंका टी २० आणि टेस्ट सिरीजच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता श्रीलंका भारत यांच्यात प्रथम टी २० ची तीन सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे आणि त्यानंतर दोन कसोटीची मालिका होणार आहे. ही मालिका आयसीसी विश्व टेस्ट चँपियनशिप २०२१-२३ चा एक हिस्सा आहे असे समजते.

दरम्यान नवीन वेळापत्रक आल्याने टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीचा व्हेन्यू बदलला गेला आहे. विराट त्याची १०० वी कसोटी मोहाली मध्ये खेळेल. यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे  विराट १०० वी कसोटी बंगलोर येथे खेळणार होता. आता ४ मार्च ते ८ मार्च या काळात ही कसोटी मोहाली येथे खेळली जाणार असून दुसरी कसोटी बंगलोर येथे १२ ते १६ मार्च दरम्यान होणार आहे.

विराटने त्याची ९९ वी कसोटी द. आफ्रिकेत खेळली होती पण पाठदुखीमुळे तो पुढचा सामना खेळू शकला नव्हता. टी २० च्या नव्या वेळापत्रकाप्रमाणे पहिला सामना २४ फेब्रुवारीला लखनौ, दुसरा २६ फेबृवारी तर तिसरा २७ फेब्रुवारी रोजी धर्मशाळा येथे होणार आहे.