कॅनडा मध्ये ५० वर्षानंतर आणीबाणी लागू

करोना नियमविरोधात रस्त्यावर उतरलेल्या ट्रक चालकांनी गेले दोन आठवडे राजधानी ओटावा वेढल्याने निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कॅनडा मध्ये ५० वर्षात प्रथमच आणीबाणी लागू झाली आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान टुडो म्हणाले, आणीबाणी लागू करण्याचा निर्णय अवघड असतो आणि सरकारपुढे ते गंभीर आव्हान आहे. पण करोना नियमाविरोधात ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी राजधानी संपूर्ण वेढली आहे. त्यांच्या समर्थनार्थ नागरिक सुद्धा रस्त्यावर येत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहेच पण सुरक्षेचा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे.

प्रदर्शन करणाऱ्यांनी रस्त्यावर तंबू, डेरे टाकून सर्व शहराला वेठीस धरले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा, स्वास्थ्य सेवा, वाहतूक विस्कळीत झाली आहे. निदर्शने करणाऱ्यांना अटक, तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देऊन सुद्धा त्यांचावर काही परिणाम झालेला नाही. यामुळे शेवटी आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.