कोविशिल्ड उत्पादक अदर पूनावाला यांचे कार कलेक्शन

लग्झरी कार्सची क्रेझ याची चर्चा सुरु झाली कि मोठमोठे फिल्मस्टार, सेलेब्रिटीज, स्पोर्ट्स पर्सन, उद्योजक यांची नावे चर्चेत येतात. सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि करोना साठी कोविशिल्ड लस उत्पादन करणारे अदर पूनावाला यांचे नाव सुद्धा या यादीत आघाडीवर आहे. अदर पूनावाला यांचे कुटुंब, पत्नी, मुले, त्यांची मालमत्ता यांचीही चर्चा अनेकदा होत असते. अदर पूनावाला यांनाही लग्झरी कार्सचा अतिशय शौक आहे आणि त्यांच्या संग्रही लग्झरी कार्सचा ताफाच आहे.

अदर यांच्या संग्रही रोल्स रॉयस फँटम, मॅक्लारेन, फेरारी, बेन्टले सह कस्टमाइज्ड मर्सिडीज व अन्य अनेक कार्स आहेत. त्यांची लाईफस्टाईल अतिशय अलिशान स्वरुपाची आहे. त्यांच्या ताफ्यातील सर्वात महाग कार रोल्स रॉयस फँटम असून तिची किंमत ९ ते ११ कोटी आहे. अदर पत्नीसह प्रवास करताना ही कार वापरतात. त्यांच्या कडे लाल रंगाची फेरारी स्पायडर ३६० सुपरकार असून तिची किंमत ४.५ कोटी आहे. अदर यांचे बरेचसे जुने फोटो या कार सोबत आहेत.

भारतात सर्वात प्रथम अदर पूनावाला यांनी मॅक्लारेन ७२० एस स्पेशल सुपरकार खरेदी केली होती. तिची किंमत ४.५ कोटी रुपये आहे. पुण्यात असतात तेव्हा अदर बेन्टले कॉन्टिनेन्टल जीटी या ४.२ कोटी रुपये किमतीच्या कारचा वापर करतात. अदर यांच्या संग्रही असलेली सर्वात खास कार आहे ‘द बॅट मोबाईल मर्सिडीज बेन्झ एस ३५०’ ही कार त्यांनी मुंबईतील एका व्यक्तीकडून कस्टमाइज करून घेतली असून बॅटमन थीम वर आहे. मुलासह जाताना अदर ही खास कार वापरतात असे सांगितले जाते.