आयपीएल २०२२, टाटा पंच काझीरंगा एडिशनचा होणार लिलाव

यंदाच्या आयपीएल २०२२ सिझनचे मुख्य प्रायोजक टाटा मोटर्स आयपीएल मध्ये त्यांची ‘ टाटा पंच काझीरंगा एडिशन’ एसयुव्हीचा लिलाव करणार आहेत अशी घोषणा केली गेली आहे. या स्पेशल मॉडेलच्या लिलावातून जी रक्कम मिळेल ती काझीरंगा अभयारण्याच्या सुरक्षेसाठी दिली जाणार आहे. या मॉडेल संदर्भात अधिक माहिती अजून प्रसिद्ध केली गेलेली नाही. मात्र आयपीएल सुरु होण्यापूर्वी ती जाहीर केली जाईल असे समजते.

सध्या टाटा पंच दिल्ली मध्ये बेस मॉडेल ५.६५ लाख ते टॉप मॉडेल ९.२९ लाख , एक्स शोरूम किमतीला उपलब्ध आहे. टाटा मोटर्स कडून प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकात आयपीएल मध्ये लिलावात ठेवली जाणारी टाटा पंच खास वेगळी एसयुव्ही असेल आणि हा लिलाव जिंकणार्याला ही स्पेशल एडिशन मिळेल. त्यामुळे त्या ग्राहकाला आयपीएल आठवणीचा एक वेगळा अनुभव मिळू शकेल असे म्हटले गेले आहे.

पंच मायक्रो एसयुव्ही भारतात दाखल झाल्यापासून अतिशय हिट बनली आहे. तिची जोरदार विक्री होत आहे. ग्लोबल एनकॅप सुरक्षा ५ स्टार रेटिंग या एसयूव्ही ला मिळाले आहे. ऑटो हेडलाईट, सात इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्राईड ऑटो, अॅपल कार प्ले, ऑप्शनल आयआरए कनेक्टीव्हिटी, क्लायमेट कंट्रोल, क्रू कंट्रोल अशी अनेक फीचर्स तिला दिली गेली आहेत. १.२ लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्स सह दिले गेले आहे.