आश्चर्यच ! 1300 वर्षांपासून एकच कुटुंब चालवत आहे हे हॉटेल

जगामध्ये असे अनेक हॉटेल आहेत, जे खूप जुने आहेत. वेळेनुसार त्या हॉटेलमध्ये बदल देखील करण्यात आलेले आहेत. मात्र जापानमध्ये असे एक हॉटेल आहे ज्याने आजही आपला इतिहास कायम ठेवला आहे. हे जगातील सर्वात जुने हॉटेल असून, याच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची देखील नोंद आहे.

(Source)

या हॉटेलचे नाव ‘निशियामा ओनसेन कियूनकन’ असे आहे. हे हॉटेल फुजिवारा महितो नावाच्या व्यक्तीने वर्ष 705 मध्ये सुरू केले होते. जवळपास 1300 वर्ष जुन्या या हॉटेलला त्यांची 52 वी पिढी चालवते.

(Source)

या हॉटेलमध्ये जगभरातील लोक येतात. हे हॉटेल आपल्या शानदार गरम झऱ्यांसाठी प्रसिध्द आहे.

(Source)

या हॉटेलच्या बाजूला एक सुंदर नदी वाहते, तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल आहे. हॉटेलची खिडकी उघड्यावर येथील शानदार दृष्य तुम्हाला बघायला मिळेल.

(Source)

या हॉटेलमध्ये एकूण 37 खोल्या आहेत. एका रात्रीचे येथील भाडे 33 हजार रूपये आहे. वेळेनुसार, या हॉटेलचे नुतनीकरण करण्यात येते. 1997 मध्ये शेवटचे नुतनीकरण करण्यात आले होते.

 

Leave a Comment