या ठिकाणी आहे जगातील सर्वात उंचावरील पोस्ट ऑफिस

स्मार्टफोनच्या काळात पत्र कोण पाठवेल ? हा प्रश्न तुमच्या मनात देखील नक्कीच आला असेल. मात्र आजही भारतातील काही ठिकाणी पत्र हेच एकमेंकाशी संपर्क करण्याचे साधन आहे. हिमाचल प्रदेशमधील हिक्किम नावाच्या गावामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय अर्थात पोस्ट ऑफिस आहे. 4440 मीटर उंची जेथे श्वास घेण्यास अडचण येते अशा ठिकाणी 1983 पासून हे टपाल कार्यालय दुर्गम भागात पत्र पाठवण्याचे काम करते.

(Source)

हिक्किमच्या आजुबाजूच्या गावांचे संचाराचे एकमात्र साधन हे पत्र आहे. या टपाल कार्यालय हिक्किमबरोबरच लांगचा-1, लांगचा-2 आणि कॉमिक गावांमध्ये पत्र पोहचवण्याचे काम करते. बर्फामुळे जून ते ऑक्टोंबरच्या काळात या ठिकाणी जाणे शक्य नसते.

(Source)

या टपाल कार्यालयात 1983 पासून रिनचेन नावाची व्यक्ती पोस्टमनचे काम करत आहे. अनेकदा बर्फामुळे त्यांना घरी परतण्यास अडचणीचा सामना देखील करावा लागतो.

(Source)

तुम्ही देखील जगातील सर्वात उंच टपाल कार्यालयातून पत्र पाठवू शकता. हिमाचल प्रदेशमधील स्पीतीतील काजापासून एक तासांच्या अंतरावर हिक्कीम आहे. पोस्ट कार्ड काजावरूनच खरेदी करावे लागते. कारण अनेकदा या ठिकाणी गरजेच्या वस्तू मिळत नाही.

(Source)

हिक्किम गाव केवळ टपाल कार्यालयासाठीच नाही तर येथे जीवाश्मांसाठी देखील प्रसिध्द आहे. येथे तुम्हाला दगडांवर काढलेले अनेक जीवाश्म आढळतील.

Leave a Comment