आश्चर्यच ! काही केले तरी कधीच भरला जात नाही हा खड्डा

जगात अनेक रहस्यमयी ठिकाण आहेत, ज्याबद्दल समजल्यावर लोक आश्चर्यचकित होतात. एक असेच ठिकाण सौदी अरेबियाच्या अल ऑफ प्रांतातील वाळवंटात आहे. येथे असा एक रहस्यमयी खड्डा आहे, जो कधीच भरला जात नाही. याच्या मागील कारण देखील विचित्र आहे.

काही वर्षांपुर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, या रहस्यमयी खड्ड्यात काहीही टाकले तरी ते आपोआप बाहेर येते.

व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले होते की, काही लोक बुल्डोजरच्या मदतीने हा खड्डा भरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये माती टाकताच ती आपोआप बाहेर येत आहे. येथे 100 फूट उंचापर्यंत मातीचा फवारा उडतो. आतमध्ये असलेल्या कोणत्याही सामानाला हा खड्डा परत बाहेर फेकतो.

(Source)

अल ऑफचे पुर्ण वाळवंट 1 लाख 212 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. येथे खूप कमी वेळा पाऊस पडतो.

हे रहस्यमयी खड्डे भरले जात नाहीत, याचे कारण येथे ब्लोहोल्स बनले आहेत. वाळवंटात नेहमीच छोट्या छोट्या खड्ड्यात ब्लोहोल्स बनलेले असतात. ज्यांना भरणे अवघड असते. या ब्लोहोल्सला नैसर्गिक वॅक्यूम देखील म्हटले जाते.

(Source)

वैज्ञानिकांनुसार, ब्लोहोल्स वातावरण, हवेचे तापमान आणि दबावावर अवलंबून असते. जेव्हा एखाद्या खड्ड्यावरून जाणारी हवा गरम असते, त्यावेळी त्याचे घनत्व हे खड्ड्यात असलेल्या हवे एवढेच असते. यामुळे ब्लोहोल्समध्ये हवेचा प्रवाह बंद होतो.  जेव्हा बाहेरची हवा गरम होते, त्यावेळी खड्ड्याच्या आतील हवा बाहेर यायला सुरूवात होते. याच कारणामुळे खड्ड्यात टाकलेली कोणतीही वस्तू आपोआप बाहेर येते.

Leave a Comment