जगातील सर्वात पॉवरफूल व्यक्ती वापरतात या कार

जगातील सर्वात पॉवरफूल व्यक्ती असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ गोविंद, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत असते. यासाठी त्यांच्या ताफ्यातील कार देखील खास असतात. आम्ही आज तुम्हाला या जगातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती वापरत असलेल्या कारबद्दल सांगणार आहोत.

(Source)

राष्ट्रपती कोविंद यांची कार ही केवळ एक कार नसून अभेद्य किल्लाच आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे मर्सिडीज बेंझ एस-600 ही कार आहे. या कारची किंमत अडीच कोटींच्या जवळपास आहे. या कारमधील सेफ्टी फीचर्स या कारला अभेद्य बनवतात.

जबरदस्त सेफ्टी फीचर्स –

या कारला अशाप्रकारे बनवण्यात आले आहे की, हँड ग्रेनेडच्या हल्ल्यानंतर देखील कारला काहीही नुकसान होणार नाही. छोट्या मिसाईल हल्ल्याचा देखील कारवर कोणताही परिणाम होत नाही. या कारचा कोणताही रजिस्ट्रेशन नंबर नाही. ही कार सेटेलाईटशी जोडलेली आहे. मर्सिडीज बेंझ एस-600 ही कार 7- स्तराच्या सेक्युरिटीने सुसज्ज आहे. कारच्या टायरवर निशाणा साधत थांबण्याचा प्रयत्न केला तरी देखील उपयोग नाही. कारण कारची रिम कस्टमाइज्ड आहे व हल्ला झेलण्याची क्षमता देखील त्यात आहे. टायर फुटल्यावर देखील कार अनेक किमी धावू शकते. या कारमध्ये केवळ ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूचाच आरसा उघडला जातो. राष्ट्रपतींच्या जवळच ऑटोमेटेड लॉक कंट्रोल्स सारखे सिस्टम असतात.

(Source)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कारमध्ये प्रवास करतात ती बीएमडब्ल्यू 7 सीरिजची 760एलआय आहे. जी देशातील सर्वात सुरक्षित कार समजली जाते.

कारचे सेफ्टी फीचर्स –

BMW 7 सीरिज 760Li ही खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बनवण्यात आली आहे. ही हँडगन आणि एके-47 ने केलेल्या हल्ल्यात देखील वाचू शकते. यामध्ये सेल्फ सीलिंग फ्यूल टँक आहे, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटू शकत नाही. ही कार पुर्णपणे व्हीआर 7 ग्रेड ब्लास्टिक प्रोटेक्शन आणि पार्ट्सद्वारे बनवण्यात आली आहे. यावर बॉम्ब आणि भूसुरंगाचा कोणताही प्रभाव पडत नाही. याचे कॅबिन गॅस हल्ल्या दरम्यान देखील गॅस सेफ चेंबरमध्ये बदलते. गाडीमध्ये 5 लीटरचे इंजिन असून, जे 375 बीएचपीची पॉवर जनरेट करते. फ्रंट विंडस्क्रीन ही पांच इंच मोठी असून, याची बॉडी ग्रेड मिलिटरीचे आहे.

(Source)

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग परदेश दौऱ्यावर जाताना आपल्याबरोबर होंगकी एन501 ही कार घेऊन जातात. लांबलचक, रूंद आणि काळ्या रंगाची ही कार आहे.

कारचे फीचर्स –

ही चीनमधील सर्वात महागड्या कार पैकी एक कार असून, या कारची सर्वसाधारण किंमत 5.50 कोटी रूपये आहे. मात्र अतिरिक्त सेफ्टी फीचर्समुळे या कारची किंमत अधिक आहे. होंगकी ही एक पॉवरफूल कार आहे. यामध्ये टर्बो चार्ज्ड इंजिन V8 आहे. जे 402 हार्स पॉवर सोबत येते.  सिंगल गॅस टँक फुल असल्यावर ही कार 500 मैल जाऊ शकते. ही कार केवळ 8 सेंकदामध्ये ताशी 100 किमीचा वेग पकडते. या कारचे वजन तब्बल 3152 किलोग्राम आहे.

(Source)

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वापरत असलेल्या कारचे नाव ‘द बीस्ट’ आहे. खास ट्रम्प यांच्यासाठी ही कार बनवण्यात आलेली आहे. बॉम्ब आणि रसायनिक हल्ल्यात देखील या कारला काहीही होऊ शकत नाही.

कारचे सेफ्टी फिचर्स –

या कारचे टायर्स कधीच पंचर होत नाहीत. जरी टायर्स नष्ट झाले तरी देखील कार रिमवर चालू शकते. कारची बॉडी 5 इंच जाड स्टील, एल्युमिनियम, टायटेनियम पासून बनलेली असून, त्यावर कोणत्याही शस्त्राचा काहीही परिणाम होत नाही. हल्ल्यात देखील या कारच्या फ्यूल टँकला आग लागत नाही. या कारचे आठ इंचाचे दरवाजे हे बोईंग विमाना एवढेच वजनदार आहेत. या कारच्या मागील सीटवर सेटेलाईट फोनची सुविधा असून, त्याद्वारे ट्रम्प थेट उपराष्ट्रपती आणि पेंटागन सोबत बोलू शकतील.

(Source)

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या प्रसिध्द कारचे नाव ‘कोर्टेज औरस’ आहे. ही कार बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष लागली आहेत. ही कार रशियाची कंपनी सॉलर्स जेएससीने तयार केली आहे. या कारची किंमत तब्बल 2048 कोटी रूपये आहे.

कारचे हायटेक फीचर्स –

या आर्मर्ड कारमध्ये 6.6 लीटर व्ही-12 इंजिन आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नाइट व्हिजन कॅमेरा, अश्रुधुरांच्या तोफांशी लढण्यासाठी जाड प्रोटेक्शन लेयर देण्यात आलेली आहे. या कारचे वजन शस्त्रांमध्ये 6.5 टन एवढे आहे. कारवर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा काहीही परिणाम होत नाही. याशिवाय कारमध्ये ऑक्सिजन सप्लाय टँक आणि रक्ताची देखील व्यवस्था करण्यात आलेली असते. या कारचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ही कार पाण्यामध्ये बुडत नाही. ही कार पाण्यात सबमरीन प्रमाणे कार्य करते.

Leave a Comment