कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर तब्बल 5 दिवस भाषण करत होता दरोडेखोर

जर्मनीच्या हॅम्बर्ग येथील जिल्हा न्यायालयाने एका बँक दरोडेखोराला साडे 12 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा दिल्यानंतर दोषी 71 वर्षीय मायकल जॉर्निक आपला कायदेशीर अधिकार ‘अंतिम शब्द’चा वापर करत न्यायालयात तब्बल 5 दिवस भाषण करत होता.

जर्मनीच्या हॅम्बर्ग जिल्हा न्यायालयाने मायकल जॉर्निकला तीन बँकेत दरोडो, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याचे उल्लंघन प्रकरणात दोषी ठरवत 12 वर्ष 6 महिन्यांची शिक्षा दिली. जर्मनीच्या कायद्यानुसार, निर्णय दिल्यानंतर ‘अंतिम शब्द’ बोलण्याचा अधिकार आहे. प्रतिवादी सर्वसाधारणपणे पश्चाताप व्यक्त करतात अथवा काहीच बोलत नाहीत.

मात्र जॉर्निक आपल्या अधिकारानुसार अंतिम शब्दात पाच दिवस भाषण देत होता. निर्णयामध्ये म्हटले आहे की, 71 वर्षीय जॉर्निक सुनावणी दरम्यान वारंवार न्यायाधिशांना अडथळे निर्माण करत होता. 1970 आणि 1980 च्या दशकात बँकेत दरोडा टाकण्याच्या प्रकरणात देखील त्याला शिक्षा झालेली आहे. 1990 मध्ये हॅम्बर्ग येथील फुहल्सब्युटेल कारागृहात कैद्यांनी केलेल्या दंगलीचे नेतृत्व देखील जॉर्निकने केले होते.

Leave a Comment