या पानाच्या दुकानात वऱ्हाडी मिळतात भाड्यावर


भारतीय संस्कृतीत लग्न हे एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे करण्याची प्रथा आहे. लग्न म्हणजे वधूवर आले, भटजी आले आणि वऱ्हाडी आलेच. वर पक्षाकडील वऱ्हाडी लोकांची बडदास्त ठेवणेही आलेच. काका, मामा, अत्तोबा, मावसोबा, मेव्हणे या मानाच्या वऱ्हाडी लोकांची खास व्यवस्था करणेही आले. आजकाल नातेवाईक कमी होत चाललेत पण लग्न तर होतातच. फार नातेवाईक नाहीत म्हणजे वऱ्हाड कमी. हरियाणाच्या अंबाला कँट मध्ये एक पानाचा ठेला आहे तेथे विविध प्रकारच्या पानपट्ट्या मिळतात तसेच वऱ्हाडी भाड्याने मिळतात.

श्रीबिहारीलालजी पानवाले असे नाव असलेल्या या ठेल्यावर येथे सर्व प्रकारचे वऱ्हाडी भाड्याने मिळतील असा बोर्ड लावला गेला आहे. हे दुकान गावात प्रसिद्ध आहे. ठेल्याचे मालक सनी एका न्यूज साईटला मुलाखत देताना म्हणाले, आमच्याकडे सर्व प्रकारचे वऱ्हाडी भाड्याने पुरविले जातात. त्यांच्या वडिलांपासून याची सुरवात झाली. येथे घोड्यासमोर नाचणारे, घोड्यामागे चालणारे, शराबी कबाबी, मामा, काका, आजोबा असे सर्व वऱ्हाडी पुरविले जातात. फक्त त्यांनी आधारकार्ड दाखवावे लागते. वऱ्हाड्याने आधारकार्ड दाखविले की तो कुठल्याही लग्नात जाऊन लग्नाची मजा लुटू शकतो. वर्षात या दुकानात वऱ्हाडी हवेत अशा ५ – ६ ऑर्डरतरी येतातच असेही समजते.

Leave a Comment