प्री आयपीएल लिलाव बिडिंग मध्ये सामील झाले सुहाना आणि आर्यन खान

आयपीएल १५ सिझनचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र शुक्रवारी प्री आयपीएल बिडिंग आयोजित केले गेले होते त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख यांची कन्या सुहाना आणि मुलगा आर्यन बंगलोर मध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले गेले असून हे दोघे  टेबलावर कोलकाता नाईट रायडर्सचा सीईओ वेंकी बरोबर चर्चा करताना दिसले आहेत.

सुहाना खान प्रथमच या कार्यक्रमात दिसली आहे मात्र आर्यन यापूर्वी शेवटच्या आयपीएल बिडीग मध्ये कोलकाता रायडर्सची सहमालक जुही चावला हिच्या मुलीसह दिसला होता. जुहीनेच आर्यन आणि तिची मुलगी जान्हवीचा फोटो शेअर करून केकेआरच्या मुलांना म्हणजे आर्यन आणि जान्हवी यांना लिलाव मेजवर पाहून आनंद वाटल्याचे म्हटले होते.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या १५ व्या सिझनसाठी आंद्रे रसेल -१२ कोटी, वरूण चक्रवर्ती ८ कोटी, वेंकटेश अय्यर ८ कोटी आणि सुनील नरेन ६ कोटी यांना रिटेन केले आहे. आता त्यांच्याकडे खेळाडू खरेदीसाठी ४८ कोटींची रक्कम शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.