किम जोंग उनशी अजूनही संपर्कात आहेत डोनाल्ड ट्रम्प

उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उनच्या मिसाईल चाचण्यामुळे जगभर तणाव असताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजही किम जोंग उनच्या संपर्कात आहेत आणि त्या दोघांमध्ये आजही चर्चा होते असा दावा केला खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच केला आहे. अमेरिकेची सत्ता सोडताना किम बरोबर चर्चा सुरु होती आणि आजही त्यात खंड पडलेला नाही असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र व्हाईट हाउस किंवा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून या बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वार्ताहर मॅगी हॅबरमन यांनी ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील संबंध स्थिर असल्याचा खुलासा त्यांच्या ‘ द कॉन्फिडंट मॅन’ पुस्तकात केला आहे. २०१८ मध्ये ट्रम्प यांनी किम जोंग उन आणि त्याच्यात काही पत्रे एकमेकांना दिल्याने जवळीक निर्माण झाल्याची घोषणा केली होती त्यांची चर्चा जगभर झाली होती. मात्र दोघांच्या मध्ये तीन वेळा चर्चा होऊनही ट्रम्प किम जोंगला अणुबॉम्ब संदर्भात समजावू शकले नव्हते. मॅगीच्या म्हणण्यानुसार या दाव्याची पुष्टी करता येत नाही. कदाचित तो खोटा असू शकतो. किंम जोंग उन हा एकमेव विदेशी नेता नेता आहे ज्याच्या संपर्कात आजही ट्रम्प आहेत असा दावा ट्रम्प करत आहेत.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार किम जोंग आजही त्यांना सर्व मोकळेपणाने सांगतो. त्याने त्याच्या काकाची हत्या कशी केली याचीही माहिती ट्रम्प यांना त्याने दिली होती. किम जोंग उन याने काकाचे डोके पायात पकडून त्याच्या छातीवर बसून त्याचे शीर धडावेगळे केले होते असे ट्रम्प सांगतात.