फॅबीस्प्रे, पहिला कोविड १९ नेसल स्प्रे लाँच

मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मा कंपनीने भारतात कोविड १९ युवा रुग्णांवर उपचारासाठी नायट्रिक ऑक्साईड नेसल स्प्रे ‘फॅबीस्प्रे’ नावाने लाँच केला असून अभिनव बायोटेक कंपनी सेनोटाइज सह त्यासाठी भागीदारी केली आहे. ग्लेनमार्कच्या फॅबीस्प्रे ला भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने उत्पादन आणि विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यात या स्प्रेचे रिझल्ट समाधानकारक आले असल्याचे समजते.

फॅबीस्प्रे, २४ तासात व्हायरल लोड ९४ टक्के तर ४८ तासात ९९ टक्के कमी करतो. नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे रुग्णासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे. जेव्हा नाकाच्या आतील आवरणावर स्प्रे फवारला जातो तेव्हा करोना विषाणू विरुद्ध एक प्रकारचे रासायनिक लेअर म्हणून तो काम करतो. कोविड १९ विरुद्ध तो प्रभावी आणि सुरक्षित ठरला आहे. कंपनीचे चीफ कमर्शियल ऑफिसर रोबर्ट क्रोकाई म्हणाले, या फॅबीस्प्रे मुळे रुग्णांना आवश्यक व वेळेनुसार योग्य चिकित्सा पर्याय मिळाला आहे याची आम्हाला खात्री आहे.