सॅमसंग गॅलेक्सी एस २२, एस २२ प्लस, एस २२ अल्ट्रा लाँच

सॅमसंग ने त्यांच्या गॅलेक्सी फ्लॅगशिप फोन खाली एस २२, एस २२ प्लस आणि एस २२ अल्ट्रा स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. एस २२ आणि एस २२ प्लसची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. या सर्व फोन साठी रिअरला तीन आणि फ्रंट सेल्फी कॅमेरा दिले गेले आहेत. एस २२ व एस २२ प्लस साठी ५० एमपीचा प्रायमरी, १२ एमपी आणि १० एमपीचे दोन सेन्सर तर सेल्फी साठी १० एमपी कॅमेरा दिला गेला आहे.

या फोन साठी ६.१ इंची फुल एचडी डिस्प्ले असून एस २२ साठी २५ डब्ल्यूची चार्जिंग वायर व एस २२ प्लस ६.६ इंची फुल एचडी डिस्प्ले आणि  ४५ डब्ल्यू चार्जिंग वायर दिली गेली आहे. सुरक्षेसाठी तगडी फीचर्स आहेत. फिंगरप्रिंट सेन्सर, प्रोक्सीमीटी सेन्सर, जिओमेग्नेटिक सेन्सर दिले गेले आहेत. हे फोन फाईव्ह जी सपोर्ट करतात आणि चार कलर ऑप्शन मध्ये आहेत. एस २२ साठी ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज तर एस २२ प्लससाठी १२ जीबी पर्यंत रॅ, आणि २५६ जीबी स्टोरेज आहे.

एस २२ अल्ट्रा साठी ६.८ इंची डिस्प्ले, १२ जीबी पर्यंत रॅम, २५६, ५१२ आणि १ टीबी स्टोरेज ऑप्शन असून प्रायमरी कॅमेरा १०८ एमपीचा आहे. १२ एमपीचा एस्ट्रा वाईड सेसंर, १० एमपीचे टेलीफोटो सेन्सर आणि सेल्फीसाठी ४० एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. या तिन्ही फोनच्या किमती अनुक्रमे ५९,७९२, ७४,७५३ आणि ८९७०० रूपये आहेत.