किम जोंगचे फोटो छापलेल्या वस्तूंनी सजला बाजार

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन मिसाईल आणि परमाणु बॉम्ब टेस्टिंग मुळे जगभरात दहशत पसरविण्यात आघाडीवर आहे. आता किम जोंगच्या प्रतिमा असलेल्या अनेक वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या असल्याने पुन्हा एकदा किम चर्चेत आला आहे. किम जोंगचे फोटो छापलेल्या अंडरवेअर्स, कोन्डोम, सेक्स टॉईज,, कॅलेंडर्स ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध केले गेले आहेत. अमेरिकन ऑनलाईन कंपनी कॅफेप्रेस वेबसाईटवर ही खरेदी करता येणार आहे. कंपनीने किम जोंगच्या नावाने आलेल्या वस्तू गुणवत्तेत उत्तम दर्जाच्या असल्याचा दावा केला आहे.

किम जोंगचा फोटो असलेली अंतर्वस्त्रे १०० टक्के रिंगस्पून कॉटन पासून तयार केली गेली आहेत. ही वस्त्रे वापरणार्याला विशेष अनुभव येईल असेही म्हटले गेले आहे. कंडोम किम जोंग बूम नावाने आहेत. त्यांची किंमत भारतीय चलनात १६५ रुपये असून सेक्स टॉईज साठी किमान २ हजार रुपये मोजावे लगातील. परमाणु मिसाईल हातात घेतलेला किम जोंग फोटो यावर आहे. २०२२ च्या कॅलेंडर मध्ये १२ महिन्यांच्या हिशोबाने किम जोंगचे फोटो छापले गेले आहेत. त्यात एका महिन्याच्या फोटोत किम जोंग डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत आहे.